शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:40 IST

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश आले. सात जागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर झाला. यात मुख्यनागरी गट तथा ...

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश आले. सात जागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर झाला. यात मुख्यनागरी गट तथा महापालिका गटातील सहा जागांमध्ये नाशिक आणि मालेगावने प्रत्येकी तीन जागा मिळवत बरोबरी साधली, तर संक्र मणकालीन गटातील एका जागेसाठी निफाड येथील भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार विजयी झाले.नियोजन भवन येथे सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरु वात झाल्यानंतर प्रथम मुख्यनागरी गटातील सर्वसाधारण प्रवर्गातील चार जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात एकूण झालेल्या २०१ मतांपैकी १५ मते बाद झाल्याने १८६ मतेच वैध ठरली. मतमोजणी करताना एका मताचे मूल्यांकन शंभरामध्ये करण्यासोबतच कमाल मतांचा कोटा ३७.२१ अर्थात ३७२१ असा निश्चित करण्यात आला. या कोट्यानुसार मतांचे मूल्यांकन करून मतमोजणीत भाजपाचे योगेश रामराव हिरे यांनी पहिल्याच फेरीत ४७ म्हणजे ४७०० मते मिळवित विजय मिळवला, तर शिवसेनेचे चंद्रकांत महादेव खाडे यांनी ४२ म्हणजे ४२०० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद यांनी ३९ म्हणजे ३९०० मूल्यांकनाची मते मिळवून विजय मिळवला, तर भाजपाचे सुनील गायकवाड यांना ३२०० आणि नंदकुमार वाल्मीक सावंत यांना २६०० मूल्यांकनाची मते पडली. या दोन्ही उमेदवारांनी कोटा पूर्ण न केल्याने त्यांच्यासाठी दुसरी फेरी झाली. त्यात सर्वाधिक मते पडलेल्या योगेश हिरे यांची कोट्यापेक्षा अधिक मते म्हणजे ९७९ कोटा मूल्यांकनाच्या अतिरिक्त मतांची पुनर्मांडणी करूनही सावंत यांना ०.००१ मूल्यांकनाची मते मिळाली. दुसºया क्रमांकाची अतिरिक्त मते मिळवूनही सावंत यांच्या मतांचे मूल्यांकन सर्वांत कमी असल्याने मतमोजणी आणि मूल्यांकन पद्धतीच्या नियमांनुसार चौथ्या जागेसाठी सुनील गायकवाड यांना विजयी घोषित करून सावंत पराभूत झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, सकाळी प्रथम संक्र मणकालीन म्हणजेच नगरपंचयात गटाच्या मतमोजणीत निफाडचे राजाराम शेलार यांनी प्रमोद देशमुख यांचा दहा मतांनी पराभव केला. शेलार यांना ५२, तर देशमुख यांना ४२ मते मिळाली, तर मुख्य नागरी गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव गटात दोन जागांसाठी तीन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत भाजपाच्या पुष्पा आव्हाड आणि शिवसेनेच्या आशा अहिरे यांना प्रत्येकी ७६ व मालेगावच्या शानऐहिंद निहाल अहमद यांना ३५ मते पडल्याने त्यांचा पराभव झाला.