शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

भाजपचा डाव जनता खपवून घेणार नाही -राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

पृथ्वीराज चव्हाण : सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ येलूरला सभा

येलूर : महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. काँग्रेस विचारसरणी नेहमीच राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येलूर (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर बदलून ते अहमदाबाद करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. देशाच्या सरहद्दीवर घुसखोरी वाढली असताना, पंतप्रधान सभा घेत फिरत आहेत. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे भाजपचे षड्यंत्र असून राष्ट्रवादीदेखील यामध्ये सहभागी आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबरची आघाडी तोडायचीच होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीत वेगळा मुद्दा आणला. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.सत्यजित देशमुख म्हणाले की, गिरजवडे एम. आय. टँक, रस्ते, पूल, बसस्थानक, प्रशासकीय इमारती आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विरोधी उमेदवार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जनता त्यांना त्यांची जागा दाखविण्यास सज्ज झाली आहे.जक्राईवाडीतील राष्ट्रवादीचे संजय गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब पाटील, गोविंदराव जाधव, संदीप जाधव, आनंदराव पाटील, उदयसिंग देशमुख, सुरेश कुराडे, के. डी. पाटील, महादेव कदम, गोपालराव जाधव, भानुदास मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचणराष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन राज्य चालविताना अनेक अडचणी आल्या. राष्ट्रवादी नेत्यांनी फायलींवर सह्या होत नाहीत असा आरोप केला. परंतु माझ्याच कालखंडात सर्वात जास्त ३६ हजार फायली निर्णायक केल्या. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.