शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून रिपाइंला ठेंगा

By admin | Updated: February 4, 2017 01:39 IST

चर्चेत गुंतविले : आता साथ देईल तोच मित्र

नाशिक : भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाला मुंबईत सन्मानाने जागा मिळाल्या असल्या तरी नाशिकमध्ये मात्र रिपाइंला भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने ठेंगा दाखविला आहे. भाजपाने रिपाइंला अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत गुंतवून ठेवले. रिपाइंला एकही जागा न दिल्यामुळे नाशिकमधील भाजपाची युती तुटल्यातच जमा आहे. विशेष म्हणजे रिपाइं शिवसेनेकडे जाऊ नये यासाठी भाजपाने रिपाइंला शेवटपर्यंत झुलवत ठेवले. रिपाइंची भाजपासोबत युती असल्यामुळे भाजपाच्या कोट्यातून रिपाइंला किमान ८ ते १० जागा मिळतील, अशी माफक अपेक्षा रिपाइंकडून व्यक्त केली जात होती. वास्तविक रिपाइंने २२ प्रभागांत तयारी केलेली असतानाही केवळ मित्रपक्षाकडून मिळणाऱ्या जागांवर समाधान मानण्याची भूमिका रिपाइंकडून घेण्यात आली होती. रिपांइला कोणत्या जागा सोडाव्यात याबाबत रिपाइंचे नेते आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये तीन बैठकाही झाल्या. पालकमंत्र्यांबरोबरची महत्त्वपूर्ण बैठकही गुरुवारीच झालेली होती. त्यामुळे रिपाइंला जागा मिळण्याची आशा होती. मात्र भाजपाच्या गोटात रात्रीतून समीकरणे बदलली आणि रिपाइंला तिकिटाच्या यादीतून वगळण्यात आले. रिपाइंला याचा थांगपत्ता लागू न देण्याची पुरेपूर खबरदारी बाळगण्यात आली होती. रिपाइंला नाराज न करता सेनेला शह देण्यासाठीच्या राजकारणात रिपाइंला मात्र ऐनवेळी बाजूला करण्यात आले. भाजापाने संपूर्ण लक्ष शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी केंद्रित केल्यामुळे ऐनवेळी भाजपाने रिपाइं टाळून पक्षात आलेल्यांना संधी देण्याला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नाराजांना गळाला लावण्यासाठी भाजपाने दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेल्या काही दिग्गज नेत्यांच्या माणसांचीही तिकिटे कापल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपाची यादी ऐनवळी बदलली गेल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूरही आता उमटू लागला आहे. दुसरीकडे भाजापाने रिपाइंला सपशेल बाजूला सारून रिपाइंची साथ सोडली आहे. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या गंभीर प्रकरणानंतरही रिपाइंकडून थेट भूमिका जाहीर करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)