शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:02 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतल्यामुळे पक्षाच्या मतदारांबरोबरच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी व शिवसेनादेखील संभ्रमात सापडली आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अधिकृत उमेदवार न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतल्यामुळे पक्षाच्या मतदारांबरोबरच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी व शिवसेनादेखील संभ्रमात सापडली आहे. अशा परिस्थितीत परवेज कोकणी यांनी शनिवारी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतल्यामुळे शिवाजी सहाणे यांच्याही छातीचे ठोके वाढले आहेत. येत्या दोन दिवसात सारे चित्र स्पष्ट होईल असे संकेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे भाजपाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.  तिरंगी लढतीमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली असून, विशेष करून भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेते यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित मांडले जात आहे. ६४४ एकूण मतदार असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे असून, त्यापाठोपाठ भाजपाची संख्या आहे. शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली, भाजपाने उमेदवार दिला नसला तरी जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांना छुपी मदत चालविली आहे.  अशा परिस्थितीत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे शिवसेनेला वाटत असले तरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याबाबतची संदिग्धता ठेवली असून, शुक्रवारी रात्री नाशिक भेटीवर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला दिल्याचे भाजपाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. असे असले तरी कोकणी यांच्या प्रचारात भाजपाच्या पदाधिकाºयांचा मात्र सहभाग कायम आहे.  भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याने दराडे व कोकणी या दोघांनाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे.भाजपाच्या भूमिकेवर राष्टÑवादीचे शिवाजी सहाणे यांचेही बरेचसे गणित अवलंबून आहे. त्यामुळे दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाईल याकडे साºयांचे लक्ष लागलेले असताना शनिवारी जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनी मुंबईत जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. कोकणी हे मूळ राष्टÑवादीचे असल्यामुळे त्यांचे भुजबळ यांच्याशी जुने सख्य आहे; परंतु ते आता विधान परिषदेचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी भुजबळ यांची घेतलेली भेट सहाणे यांना काळजीत टाकणारी आहे. तथापि, सहाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने रविवारी रात्री पक्षाचे नेते अजित पवार नाशिक दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दोन्ही कॉँग्रेसची बैठक बोलविण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक