शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मनपाच्या भ्रष्टाचारात भाजपाही सहभागी

By admin | Updated: February 13, 2017 00:21 IST

जाहीरनाम्यात कबुली : सत्तेचा सोयिस्कर विसर

नाशिक : गत पंचवार्षिकमध्ये नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती काठावरची सत्ता सोपविल्यानंतर लागलीच मनसेच्या इंजिनला डबा जोडून सत्तेत सहभागी झालेल्या भाजपाने येत्या निवडणुकीत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मनपाचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन पक्षाच्या ध्येयनाम्यात देतानाच दुसरीकडे मनसेच्या काळात महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत, आपणही त्यात कधीकाळी सहभागी झाल्याचे मान्य केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ध्येयनामा जाहीर करून अन्य राजकीय पक्षांपेक्षा आघाडी घेतली असली तरी, या ध्येयनाम्यातील काही बाबी पक्षाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. महापालिकेत पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन देताना भाजपाने म्हटले आहे की, आॅनलाइन प्रणाली सुरू करणार, सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार, माहिती अधिकार काटेकोरपणे राबविणार, महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार, विकासकामांच्या निविदांच्या अंतिम देयकासंदर्भात सर्व आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करणार. अर्थातच भाजपाने ध्येयनाम्यात वचन दिलेल्या बाबींपैकी बऱ्याचशा गोष्टींची अंमलबजावणी महापालिकेत सुरू असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार असे भाजपाने म्हटले आहे. त्यांच्या या म्हणण्याचा सरळ अर्थ असा निघतो की, सध्याच्या काळात व यापूर्वीच्या काळातही महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून, भाजपा या भ्रष्टाचारापासून महापालिकेला मुक्त करणार आहे. तथापि, ध्येयनामा तयार करताना भाजपाला नेमका त्यांच्या सत्तेतील वाट्याचा विसर पडला आहे. नाशिक महापालिकेत कॉँगे्रसची राजवट संपुष्टात आल्यानंतर झालेल्या सत्तांतरात भाजपानेही महापालिकेची सत्ता भोगली आहे. सेनेचे वसंत गिते महापौर झाल्यानंतर उपमहापौर म्हणून सन २००७ ते ०९ या काळात सध्याचे भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाकडून महापालिकेच्या सत्तेत सहभागी झाले, तर त्यानंतर २००२ ते २००५ या काळात भाजपाच्या शोभना अहेर यांनीही उपमहापौर म्हणून कामकाज पाहिले आहे. २००५ ते २००७ या काळात तर भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून खुर्चीवर विराजमान झाले होते. (प्रतिनिधी)