शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:37 IST

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण्याची मागणी केली असून, त्याविषयी मात्र एकाही आमदाराने ठोस भुमिका स्पष्ट न केल्याने गुरुवारी (दि.२६) भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.

ठळक मुद्देभाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.

नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण्याची मागणी केली असून, त्याविषयी मात्र एकाही आमदाराने ठोस भुमिका स्पष्ट न केल्याने गुरुवारी (दि.२६) भाजपा आमदारांचे राजीनामा नाट्य नाशिककरांना पाहायला मिळाले.चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार राहुल अहेर यांनी गुरुवारी (दि.२६) मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी जमले असताना आंदोलकांची भेट घेत आपण आरक्षणासाठी समाजासोबत असल्याचे सांगितले. समाजाच्या प्रतिनिधींना त्यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले असता त्यांनी आंदोलनस्थळीच राजीनाम्याचे पत्र लिहिले. परंतु हे पत्र कोणाला उद्देशून आहे. याविषयी पत्रावर उल्लेख करणे टाळतानाच ‘हेच माझ्या राजीनाम्याचे पत्र समजावे ’ असा उल्लेख पत्रावर केला आहे, तर पश्चिम नाशिक मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही दुपारी मराठा समाज प्रतिनिधींकडे राजीनाम्याचे पत्र सोपवले. परंतु, हे पत्र त्यांनी चक्क मराठा क्रांती मोर्चाला उद्देशून राजीनामा पत्र लिहिले आहे. नियमानुसार आमदाराने राजीनामा पत्र विधानसभा अध्यक्षांना देणे क्रमप्राप्त आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी याचप्रकारे विधानसभा अध्यक्षांना ई- मेलद्वारे राजीनामे पाठवून दिला आहे.  परंतु, नाशिकमध्ये आमदारांनी अशाप्रकारे समाज प्रतिनिधींकडे आपला राजीनामा सोपवल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेचा वर्षाव सुरू झाला.आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा द्या!मराठा समाजाला आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या दबावामुळे काही आमदारांनी राजीनाम्याची तयारी दाखविली आहे. परंतु त्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांनी केले आहे. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला व राजीनाम्याचे पत्र दिले. परंतु सीमा हिरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला नसल्याचेही नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण