शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसविषयी भाजपा सरकार मवाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:24 IST

राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार निर्माण करीत आहे. मात्र राष्टÑवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच. शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो. त्याचमुळे राष्टÑवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

नाशिक : राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार निर्माण करीत आहे. मात्र राष्टÑवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच. शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो. त्याचमुळे राष्टÑवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्या मित्र पक्षाविषयी मात्र समन्वय आणि मित्रत्वाची भूमिका असल्याचे सांगत  कॉँग्रेसचा नामोल्लेख न करता त्यांनी राज्य सरकारकडून त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेतली जात असल्याची टीका केली आहे.  नाशिकच्या जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर जयंत पाटील यांनी रविवारी (दि.२४) ग्रामीण आणि शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या बैठका राष्ट्रवादी भवनात घेतल्या. यावेळी त्यांनी ही टीका करतानाच येत्या १ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचे संकेत दिले. आमदार हेमंत टकले,नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.राज्यातील नव्या सरकारची नवलाई संपुष्टात आली असून, तीन वर्षांत विविध पातळ्यांवर अपयश आलेले हे अपयशी सरकार आहे. तीन वर्षांत राज्याची प्रगती झाली की अधोगती याचा विचार केल्यानंतर आता कोणताही सुजाण नागरिक पुन्हा कमळाला मत देणार नाही. सध्याच्या सरकारविषयी भाजपा कार्यकर्त्यांशिवाय कोणीही उत्साहाने बोलत नाही, असे सांगून जयंत पाटील म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे वातावरण भाजपा करीत आहेत. मात्र विरोधी पक्ष म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसच प्रभावी ठरू शकत असल्याने जाणीवपूर्वक समज- गैरसमज निर्माण करणाºया चर्चा पसरवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे राष्टÑवादीला नामोहरम करण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. असे सांगून त्यांनी आपल्या मित्राविषयी मात्र सद्भावना आणि मित्रत्वाची भूमिका सरकारची दिसते आहे, असे ते म्हणाले. सार्वत्रिक निवडणुकांना आता अवघे दीड ते दोन वर्षे शिल्लक असल्याने आता कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असे सांगून त्यांनी १ आॅक्टोबर रोजी राज्यात भाजपा सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, तसे प्रदेश स्तरावरून घोषित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  यावेळी पक्षाच्या निरीक्षक श्रीमती भोसले तसेच जयश्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केले. कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, प्रेरणा बलकवडे, पुरुषोत्तम कडलग, दिलीप बनकर, विश्वास ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.तालुकानिहाय बैठकाराज्यात राष्टÑवादी कॉँग्रेस प्रबळ विरोधी पक्ष आहे. छगन भुजबळ येथे असते तर आम्हाला येथे येऊन भाषणे करावी लागली नसती असे सांगून पाटील यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्णात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दिवाळीनंतर तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना गटतट विसरून एकत्रितपणे हजर राहावे आणि मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तोपर्यंत महिला आणि युवक आघाडीची जिल्हा कार्यकारिणी तयार झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. येत्या १ तारखेला राज्य सरकार विरोधी आंदोलन तर २ आॅक्टोबर रोजी सभासद नोंदणी तसेच ३ आॅक्टोबर प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.नेते जमले व्यासपीठावरनाशिकमध्ये राष्टÑवादीची अवस्था बिकट मानली जातअसली तरी रविवारी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत अलीकडे पक्षाच्या बैठकीत न दिसणाºया अनेक नेत्यांनी हजेरी लावली. माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यात समावेश होता. बैठकीसाठी उपस्थित नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या मोटारींमुळे महामार्गाचा समांतर मार्ग ठप्प झाला होता.