शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकांना ध्वनिफीत भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:33 IST

गेल्या बुधवारी (दि. २०) झालेल्या महापालिकेच्या महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनिफीत शिवसेनेकडून संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकविली जाणार असून, फलकही झळकवणार आहेत. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत मागविली असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक : गेल्या बुधवारी (दि. २०) झालेल्या महापालिकेच्या महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनिफीत शिवसेनेकडून संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकविली जाणार असून, फलकही झळकवणार आहेत. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत मागविली असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र, सेनेला काउंटर करण्यासाठी लगोलग भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही लक्षवेधी सादर करत शहरात साथरोगाचा प्रभाग गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सात तास चाललेल्या महासभेत शिवसेना प्रशासनावर तुटून पडली असताना भाजपाचे एकेक नगरसेवक प्रशासनातील अधिकाºयांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसोद्गार काढत होते. अधिकाºयांना दूरध्वनी केल्यानंतर ते कसे पाच मिनिटांत हजर झाले, असे प्रसंगही रंगवून सांगितले गेले. काही भाजपा नगरसेवकांनी अस्वच्छतेला प्रशासन नव्हे तर नागरीकच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. आता शिवसेनेने नागरिकांवर प्रहार करणाºया भाजपा नगरसेवकांची ध्वनीफीतच नगरसचिव विभागाकडे मागितली असून, त्या-त्या नगरसेवकाने केलेल्या भाषणाची ध्वनीफीत त्यांच्या प्रभागात ऐकविली जाणार आहे तसेच प्रभागांमध्ये जाहीररीत्या फलकही झळकवले जाणार आहेत. त्यामुळे भाजपाचे खरे स्वरूप नागरिकांना समजणार असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.ध्वनिफीत मिळण्याबाबत शंकाविरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी लेखीपत्र देऊन महासभेच्या कामकाजाची ध्वनिफीत नगरसचिव विभागाकडे मागितली आहे. परंतु, नगरसचिव विभागाकडून सदर ध्वनिफीत देण्याबाबत टाळाटाळ केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय सत्ताधारी भाजपाकडूनही सदर ध्वनिफीत सेनेच्या हातात जाऊ नये, याकरिता प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. सेनेला ध्वनिफीत उपलब्ध करून न दिल्यास पुन्हा भाजपाच टीकेची धनी होण्याची शक्यता आहे.