शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांना अटक

By admin | Updated: May 27, 2017 00:44 IST

नाशिक : पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित व बेपत्ता असलेला जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीतील श्रीपाद सूर्यवंशी खुनातील संशयित व १ आॅक्टोबर २०१५ पासून बेपत्ता असलेला पंचवटीतील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याच्या खुनाचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे़ बेपत्ता ज्वाल्या हा ज्या दोघा संशयितांबरोबर अखेरचा दिसला होता त्यांना अटक करून त्यांची पोलीस स्टाइलने चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला़ ज्वाल्याच्या खुनात पोलिसांनी भाजपा नगरसेवक हेमंत (अण्णा) शेट्टी यांच्यासह सहा संशयितांवर शुक्रवारी (दि़ २६) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये पंचवटीतील वाघ खुनासह विविध गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांचा समावेश असून, खून करून पुरावे नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे़१ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जालिंदर उगलमुगले हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती़ या तपासात ज्वाल्याचा घातपात झाल्याचे तसेच त्यास अखेरचे संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांच्यासोबत बघितल्याचे समोर आले़ यावरून कौलकर व कडाळे या दोघांना अटक करून पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ज्वाल्याला वाघाडी येथे नेऊन दारू पाजून टाकळी परिसरात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्याम महाजन यांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले़ कौलकर व कडाळे यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पंचवटी पोलिसांनी या गुन्ह्यात श्याम महाजन यास अटक करून सखोल तपास केला असता त्याने अपहृत ज्वाल्याचा परदेशी व कोष्टी यांच्या मदतीने खून करून इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे या शिवारात नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली दिली़ याबाबत घोटी पोलिसांकडे तपास केला असता तेथे अकस्मात मृत्यूची नोंद आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी परदेशी व कोष्टी यांच्यावर खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान हे दोघे कारागृहात असून, त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ, विजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, पोलीस हवालदार कोकाटे, भास्कर गवळी, सुरेश नरवडे, सचिन म्हसदे, महेश साळुंखे, प्रभाकर पवार, संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, भूषण रायते, संदीप शेळके, संतोष काकड, उत्तम खरपडे, मुक्तार शेख यांनी ही कामगिरी केली़