शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना हाऊसफुल्ल, अन्य पक्षांची मात्र शोधाशोध

By admin | Updated: January 24, 2017 16:37 IST

राजकारण : प्रमुख पक्षांतील नाराज गळाला लावण्याचे प्रयत्न

भाजपा-सेना हाऊसफुल्ल, अन्य पक्षांची मात्र शोधाशोध

 राजकारण : प्रमुख पक्षांतील नाराज गळाला लावण्याचे प्रयत्न

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाला भरती आली असली तरी यंदा या निवडणुकीत इच्छुकांनाही चांगले दिन आले आहेत. शिवसेना आणि भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसे आणि तेही नसेल तर अन्य छोट्या पक्षांकडून संधी मिळणार आहे. साहजिकच या निवडणुकीत छोट्या पक्षांचा चंचूप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी स्थिती आहे. महापालिका निवडणुकीत यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती असून, त्यामुळेच सर्वच पक्षांना किमान दोन किंवा तीन सक्षम उमेदवार असले पाहिजे, यावर भर आहे. भाजपा आणि शिवसेनेकडे सुमारे दीड हजार इच्छुकांनी नावे नोंदवली असून, त्यांच्याकडे मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार दाखल झाले आहेत. त्यामुळे या पक्षांची अवस्था बिकट झाली असून, या पक्षांना अनेक प्रभागात उमेदवारच नाहीत. भाजपाकडे आणि शिवसेनेकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांमुळे तीन दिवस मुलाखती चालल्या किंवा सुरू आहेत. परंतु अन्य पक्षांकडे एक ते दीड दिवसात सर्व इच्छुकांच्या मुलाखती संपल्या आहेत. त्यामुळे आता भाजपा आणि सेनेतून ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, अशा नाराजांना शोधून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांना कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेलच, या शिवाय बहुजन समाज पार्टी, रिपाइंसह विविध आंबेडकरवादी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेला दल, सरकार पक्षातील घटक पक्ष असलेले रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच अन्य पक्षांची आघाडी, विविध छोट्या पक्षांनी एकत्र येऊन केलेली पुरोगामी आघाडी तसेच हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, असे मोठ्या संख्येने पक्ष निवडणुकीत नशीब आजमावणार असून, अनेक पक्षांचे नाशिकमध्ये यापूर्वी काहीच अस्तित्व नव्हते, असे पक्षही आता नाशिकमधील प्रस्थापित कार्यकर्ते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या नाही तर त्या पक्षाकडून अशी बऱ्याच इच्छुकांना उमेदवारी मिळणार आहे. ..इन्फो. . आणखी तीन उमेदवार घेऊन या... काही पक्षांच्या मुलाखती सध्या सुरू असून, एका प्रभागातून एक ते दोन इच्छुक असल्यास त्यांना सरळ आणखी उर्वरित इच्छुकांचा शोध घेऊन मग या म्हणजे चौघांना निवडणूक लढविता येईल, असे सांगितले जात आहे.