शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पुन्हा स्वबळावर

By admin | Updated: January 17, 2017 23:49 IST

युती नाहीच : शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा

नाशिक : राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा - सेनेत युती करण्यासाठी प्रदेश पातळीवर हालचाली सुरू असताना नाशिकमध्ये मात्र भाजपा स्वबळावरच लढणार आहे. शिवसेनेकडून प्रस्तावही येत नाही आणि प्रतिसादही मिळत नसल्याचे सांगत भाजपाने शिवसेनेवर खापर फोडले आहेत.  नाशिक महापालिकेत गेल्यावेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली नव्हती. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपा आणि सेनेचे संख्याबळ एकत्र आले तरी महापौर होणार नव्हता. त्याचदरम्यान भाजपाने सर्वाधिक संख्या असलेल्या मनसेला पाठिंबा दिला आणि त्यानंतर मनसेबरोबरच अडीच वर्ष काढले. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्याने या निवडणुका युतीने लढायची तयारी झाल्याने भाजपाने मनसेला पुन्हा पाठिंबा न देता शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात मात्र अशा घडामोडी घडल्या की विधानसभा निवडणुकीत युती झालीच नाही.  भाजपा-सेनेची स्थानिक पातळीवर झालेली युती मात्र कायम असताना आता मात्र भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. भाजपाच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतीप्रसंगी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी महापलिका निवडणूक स्वंतत्र्यरीत्या लढणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्यावेळी भाजपाने स्वतंत्र्यरीत्या स्वबळावरच निवडणूक लढविली होती. त्यानंतर युती झाली असली तरी महापालिकेच्या नाशिकरोड विभागात झालेल्या दोन पोटनिवडणुकींच्या वेळी शिवसेनेला युती करण्यासाठी आग्रह केल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आताही शिवसेनेकडून प्रतिसाद आणि प्रस्ताव मिळत नाही. त्यातच भाजपाकडे ३१ प्रभागांसाठी सातशे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, अशा स्थितीत स्वबळावर निवडणुका लढविण्यात याव्यात यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असल्याने भाजपा स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सानप यांनी सांगितले. यावेळी संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे तसेच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.