शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बिटको, जिल्हा रुग्णालयात ६४० अतिरिक्त बेड‌्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:13 IST

नाशिक : रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड‌्स‌ उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड‌्सची व्यवस्था करण्याची ...

नाशिक : रुग्णसंख्या सातत्याने वाढत असतानाच बेड‌्स‌ उपलब्ध होत नसल्याचीदेखील तक्रार येत असल्याने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला अतिरिक्त बेड‌्सची व्यवस्था करण्याची सूचना मागील आठवड्यात केली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण ६४० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच दुपारी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांची सांगितले, जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी ११० खाटांची क्षमता होती. तेथे आता ९० बेड‌्स वाढविल्याने २०० बेड‌्सची क्षमता झाली आहे. बिटको रुग्णालयात ३०० , नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये २५० असे एकूण ६४० अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मविप्र आणि एसएमबीटी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातूनही बेड उपलब्ध होतील, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

--इन्फो--

बिटको रुग्णालयात सिटी स्कॅन

बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार असून, दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रतिदिवस पाच हजार स्वॅब तपासले जाणार असल्याची माहिती, भुजबळ यांनी दिली.

कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचारांबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन २५० लिटर क्षमतेचे २७ ड्युरा सिलिंडर मागविण्यात आले आहे. या सिलिंडरमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे सुलभ होणार आहे.

--इन्फो--

खासगी संस्था, डॉक्टर्सला आवाहन

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन प्रशासन आपल्यास्तरावरून करत आहे. कोरोनासारख्या संकटकाळात खासगी डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आपली सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

व्हेंटिलेटरबाबत योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटिलेटर पोहोचविण्यात आले असून, १० ते १२ व्हेंटिलेटर आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन, एमआरआय कक्ष, कोविड कक्ष, प्रयोगशाळेस भेट दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा व अतिरिक्त वाढविण्यात आलेल्या बेडचा आढावा घेतला. कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी केली आहे.

===Photopath===

040421\04nsk_24_04042021_13.jpg

===Caption===

बिटको रूग्णालयात आरोग्य सुविधांची माहिती घेतांना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढणे, मनपा आयुक्त कैलास जाधव आदि.