शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

थेंबभर पाण्यासाठी पक्ष्यांची होते ससेहोलपट

By admin | Updated: May 22, 2014 17:15 IST

रेडगाव खुर्द : सततच्या अल्पपावसाने विहिरी-बारवा, बोअरवेल, बंधारे कधीच कोरडे पडले असल्याने सध्या सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.

रेडगाव खुर्द : सततच्या अल्पपावसाने विहिरी-बारवा, बोअरवेल, बंधारे कधीच कोरडे पडले असल्याने सध्या सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पशु-पक्ष्यांनाही त्याची झळ बसत असून, थेंबभर पाण्यासाठी पक्ष्यांना केविलवाणा आटापिटा करावा लागत आहे. गेल्या काही वर्षातील पावसाचे घटते प्रमाण व अनियमितता यामुळे बंधार्‍यांचा सांडवा ओसंडून वाहिला नाही. परिणामी जलसाठ्यात थोड्याफार प्रमाणात साचलेले पाणी अल्पजीवी ठरते, तर विहिरी, बोअरवेल यांनी हिवाळ्यातच तळ गाठला. अशा परिस्थितीत बख्खळ पाण्याअभावी आहाळांची जागा बंदिस्त टाक्यांनी घेतली. अनेकजण सध्या विकत पाणी आणून कुटुंबासह पशुधनाची तृष्णा भागवत आहे तसेच विहिरीतून पाणी खेचण्यापासून घर व टाक्यापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाते. अशा विविध कारणाने कुठेही उघड्यावर पाण्याचे डबके साचत नाही. सर्वत्र पाण्याचा ठणाणा आहे. त्यामुळे एरवी सहसा जवळ न येणारे पक्षी धुणीभांडी करताना प्रसंगी महिला, मुले, नागरिक पाणी वाहत असताना नजर चुकवून डोक्यावरील हंडा, बादलीतील पाण्यावर तृष्णा भागवताना दिसतात. तसेच बंदिस्त टाक्यांचा नळातून गळणारा वा टाकीतून पाझरणार्‍या थेंबाला चोचीत घेण्यासाठी पक्ष्यांना केविलवाणा आटापिटा करावा लागत असल्याचे पाहवयास मिळते. पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट दिसत असताना रेडगाव येथील पुरोहित सुधाकर कुलकर्णी हे अल्पशा प्रयत्नातून दिवसभरात काही तुषार्त पक्ष्यांना दिलासा देत आहे. कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून भिंतीवर प्लॅस्टिकच्या छोट्या भांड्यात पाणी भरून ठेवतात. चिमणी - कावळे व इतर पक्षी येऊन आपली तृष्णा भागवतात. दिवसभरात ८-१० वेळेस या भांड्यात पाणी भरतात. दररोज पाच-पन्नास पक्ष्यांच्या कोरड्या घशाला ओलावा देणारा कुलकर्णी यांचा भूतदयेचा छोटासा प्रयत्न आदर्शवत आहे.(वार्ताहर)