शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

पक्षीनिरीक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:19 IST

नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे.

ठळक मुद्दे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यातवन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार

नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे.नाशिकपासून तीस किलोमीटरवर चापडगाव पक्षीनिरीक्षण केंद्र नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यात पहावयास मिळते. यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅण्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांची जैवविविधता लक्षात यावी, जेणेकरून निसर्गाचा दागिना असलेल्या पक्ष्यांविषयी आवड निर्माण होईल, या उद्देशाने प्रथम पक्षी संमेलन आयोजित करत असल्याची माहिती वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनप्रमुख सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे उपस्थित होते. १९ जानेवारीपासून संमेलनाला प्रारंभ होणार आहे. वनविभागाच्या मुख्य अधिकाºयांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटनाचा सोहळा संपन्न होणार आहे. तीन दिवस चालणाºया या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमित दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संमेलनासाठी वन्यजीव विभागाकडून (६६६.ु्र१ािी२३्र५ं’.ल्लं२ँ्र‘६्र’’्रिाी.ूङ्मे ) हे सविस्तर माहितीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. संमेलनासाठी नियमितपणे वाहनतळ व प्रवेश शुल्कातकोणतीही सूट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.असे असेल संमेलन... सकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरीक्षण शिवार फेरी. सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यान. दुपारच्या सत्रात पक्षी छायाचित्रण, निरीक्षणाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन. अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धा.