पेठ : तालुक्यातील करंजखेड, तोरणमाळ व डिक्सळ येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात लहान-मोठे बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा माहिमेस हातभार लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़शासनाच्या जलयुक्त शिवार मोहिमेला बळकटी मिळावी तसेच नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजावे यासाठी पंचायत समिती सदस्य मुदा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन वनराई बंधारे बांधले़ पंचायत समिती सदस्य मंदा चौधरी यांनी हातात कुदळ, पावडे घेऊन बंधाऱ्याच्या कामास हातभार लावला़ यामुळे परिसरातील नागरिकांनाही याची सवय जडल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अशा प्रकारचे वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे़ यावेळी सरपंच टोपले, ग्रामसेवक व्ही़ के. खंबाईत, मुख्याध्यापक संतोष च्हाण, महाले, तांगडकर, गाढवे, नामदेव गवळी, भाऊराव राऊत, दत्तात्रय बाम्हणे, भास्कर भुसारे, लक्ष्मण शेवरे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. चिमुकल्यांनीही या उपक्रमाद्वारे ‘अडेल पाणी तर मिळेल पाणी’ हा संदेश दिला़ (वार्ताहर)
चिमुकल्यांनी बांधला बंधारा
By admin | Updated: October 25, 2015 22:28 IST