शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कांदा लिलाव बंदमुळे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

धुळवड सणामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते ...

धुळवड सणामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते दोन लाख क्विंटल विक्री होणाऱ्या या शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. त्यामुळे वीस कोटींचा फटका बसला असून, विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. सलग लिलाव बंदमुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर व्यापारी हमाल, मापारी, ट्रक मालक, चालक, मालक व्यावसायिकांच्या दुकानाचे व्यवहार ठप्प होणार आहेत. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागांत जिल्ह्यातून कांदा निर्यात होत असो, एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे ३० ते ३५ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते. मात्र, उद्या व परवा सलग दोन दिवस जिल्ह्यातील कांद्याबरोबरच शेतीमालाचे लिलाव बंद असल्याने, कांदा पिकासह भाजीपाला याची प्रथमच कोंडी होत आहे. लासलगाव येथील भाजीपाला लिलावात मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.

बाजार समित्या ४ एप्रिलपर्यंत बंदच

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दि. ४ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्या ८ ते १० दिवस बंद राहणार आहेत. ऐन कांदा काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात अडचणी येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या कामात व्यत्यय येत गेला. काम सुलभ होण्यासाठी मजूर टंचाईचे कारण देत, खुले कांदा लिलाव गोणीत सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांचा विरोध झाल्यावर पुन्हा ते खुल्या पद्धतीने सुरू झाले. आता पुन्हा ऐन काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज दि. ४ एप्रिलपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना अनेक अडचणी येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात काढणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक गरज व अवकाळीमुळे कांद्याची टिकवण क्षमता घटली. परिणामी, शेतकरी कांदा विक्री करताना करताना दिसून येत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कांदा कसा विकायचा, असा प्रश्न आहे. आठ-दहा दिवस कामकाज बंद राहणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी किमान दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बाजार समित्या बंदची स्थिती

बाजार समित्या बंदची तारीख

लासलगाव २७ ते ४ एप्रिल

पिंपळगाव २९ ते ४ एप्रिल

नामपूर २६ ते ४ एप्रिल

उमराणे २७ ते ४ एप्रिल

मनमाड २९ ते ४ एप्रिल

येवला २५ ते ४ एप्रिल

सिन्नर २७ ते ४ एप्रिल