शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:24 IST

दिंडोरी : तालुक्यात गेल्या २४ तासांत दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यांमुळे द्राक्ष उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यात मण्यांना तडे गेल्याने उत्पादक हवालदिल

नळवाडी येथील द्राक्ष निर्यातदार कैलास कांगणे व विलास कांगणे या शेतकऱ्यांचे ९० लाखांचे, पाडे येथील शेतकरी सुरेश काशीनाथ नाठे यांच्या दोन एकर बागेचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले. पेपर लावलेल्या व बिगरपेपर द्राक्षबागाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तालुक्यातील अन्य गावातही परिपक्व (पाणी उत्तरलेल्या) बागांचेही मोठे नुकसान झाले.तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे देण्यासाठी आलेल्या सर्वच द्राक्षबागांना तड्यांचा मोठा फटका बसला आहे. कालपर्यंत या द्राक्षबागाचे कमी प्रमाणात नुकसान दिसत होते. मात्र, रात्री झालेल्या पावसामुळे साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ज्या द्राक्षबागांची अर्ली छाटणी झालेली आहे, त्या बागा देण्यासाठी आलेल्या होत्या. काही ठिकाणी सुपर मार्केटसाठी खुडा चालू होणार होता. सध्या या सुपर मार्केटचा बाजारभाव ८० ते ९० रुपये प्रति किलो आहे. त्या सर्वात जास्त नुकसान हे निर्यातक्षम द्राक्षबागाचे झाले आहे. आतापर्यंत फक्त पाऊस झाल्यास पेपर लावलेल्या द्राक्षबागाचे नुकसान होत असे. मात्र, या अवकाळी पावसाने बिगर पेपर द्राक्षबागाचेही मोठे नुकसान झाले आहे.डावणी, भुरी रोगाचा प्रादुर्भावतालुक्यात ज्या द्राक्षबागाची यंदा उशिरा छाटणी केली. त्या बागानाही अवकाळी पावसाचा फटका बसला. या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात डावणी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येते आहे. मागील द्राक्ष हंगामात कोरोनामुळे उत्पादकाचे मोठे नुकसान झाले होते, साधे भांडवलही द्राक्ष उत्पादकाना वसूल करता आले नाही. त्यामुळे मागील वर्षी उधारीत घेतलेल्या औषधाचे पैसेही देता आलेले नाही. यंदा उत्पादक कसा तरी उभा राहून त्यांने उधार उसनवारी करून आपली द्राक्षबागा मोठ्या कष्टाने तयार केली होती. मात्र, चालू वर्षी पुन्हा अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती