निफाड : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे गावाजवळ बिअरचा ट्रक पलटी झाल्याची घटना गुरूवारी घडली. ट्रक क्र . एम.एच. ०४ एफ. यू. ८७५० हा औरंगाबादहून नाशिककडे जाताना पिंपळस गावाजवळ पलटी झाला. या ट्रकमधील खोक्यामध्ये बिअर होत्या. ट्रकमध्ये बिअर असल्याचे समजल्यानंतर काही लोकांनी या पलटलेल्या ट्रकमधील २५ ते ३० खोके लांबवले. उर्वरित खोके सुरक्षित राहिले. सुदैवाने ट्रक चालकासह कुणालाही या अपघातात दुखापत झाली नाही. निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बिअरचा ट्रक उलटला
By admin | Updated: July 29, 2016 01:30 IST