नाशिक : मैत्रिणींसोबत बोलत असताना गाडीवर ठेवलेला मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना होलाराम कॉलनीत घडली़ कोमल सुतार (रा़ स्नेहवर्धिनी अपार्टमेंट, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि़ १७) सायंकाळच्या सुमारास परिमल बिल्डिंगच्या गेटवर त्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होत्या़ त्यांनी आपला मोबाइल गाडीवर ठेवलेला होता़ चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
दुचाकीवरील मोबाइल चोरला
By admin | Updated: April 20, 2017 16:01 IST