शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला मोठी आशा; मनसेचा भ्रमनिरास ?

By admin | Updated: February 19, 2017 00:17 IST

शिवसेनेला मोठी आशा; मनसेचा भ्रमनिरास ?

सिडको : अनेक विद्यमान नगरसेवकांनी सोडलेल्या साथीमुळे जर्जर झालेल्या मनसेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी शिवसेना सिडकोत मोठी आशा बाळगून आहे, अगदी त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेली भाजपादेखील यंदाच्या निवडणुकीत चमत्काराच्या आशेवर आहे. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत कॉँग्रेस आघाडीदेखील दावा करीत असली तरी, सिडकोत भाजपा व शिवसेनेत उमेदवारीवरून झालेली बंडखोरी लक्षात घेता, त्याचा फटकाही तितकाच सहन करावा लागणार आहे.  गेल्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक या भागातून निवडून आले, त्याचबरोबरीने सेनेलाही यश मिळाले. विशेष म्हणजे मनसेने हा विजय संपादन करताना सेना व भाजपाच्याच ताब्यातील जागा हिसकावून घेतल्या होत्या, त्यामुळे मनसेचा फटका सेना-भाजपालाच बसला, परिणामी भाजपा गेल्या निवडणुकीत सिडकोतून खाते सुद्धा उघडू शकली नाही. त्यामानाने कॉँग्रेस व राष्ट्रवादीने तिसरा क्रमांक कायम ठेवला होता. माकपाने एक जागा राखून अस्तित्व कायम ठेवले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम सिडकोतील राजकारणावर झाला. मनसेबरोबर पाच वर्षेही नगरसेवक राहू शकले नाहीत, अनेकांनी निवडणुकीच्या तोंडावर सेना, भाजपाला जवळ केले, परिणामी मनसे जर्जर झाली. या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत सर्व प्रभागात उमेदवार दिले असले तरी, त्यांची लढाई पूर्वीच्या मनसे व विद्यमान सेनेच्या नगरसेवकांशी होत असल्यामुळे त्यांचा टिकाव लागणे कठीण आहे. शिवसेनेला अच्छे दिन येतील अशी आशा बाळगून निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या भरतीमुळे ताकद वाढल्याचे दिसत असले तरी, त्यातून झालेली बंडखोरी पक्षासाठी घातक ठरण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, सेनेने हा धोका ओळखून अधिकाधिक लक्ष सिडकोवर केंद्रित केले असून, राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीत सेना पुढे निघून गेली आहे. गेल्या निवडणुकीत सिडकोवासीयांनी साफ नाकारलेल्या भाजपाने यंदा केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ताकद अजमाविण्याचा प्रयत्न चालविला असून, काही प्रमाणात त्यांना यश मिळण्याची आशा आहे. सेनेप्रमाणे भाजपालाही बंडखोरीने ग्रासल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक मात्र खरे भाजपा खाते उघडेल यावर जाणकारांचे एकमत आहे.