येवला : हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे जय बाबाजी परिवारातर्फे येवल्याहून नाशिक जवळील अंजनेरी पर्वतावर २४ बाय ४८ फूट लांबी आणि रूंदी असलेला भगवा ध्वज फडकविण्यात आला. गेल्या सात वर्षांपासून हनुमानाची जन्मभूमी समजली जाणाऱ्या नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर येवल्याच्या जयबाबाजी भक्त परिवाराकडून हनुमान जयंतीनिमित्त ध्वज लावला जात असतो.दरवर्षी या ध्वजाची लांबी व रूंदी वाढवली जात आहे. या महाकाय ध्वजावर उभे असलेले हनुमान छाती फाडून दाखवताना व जय श्रीराम, गदा असे चित्र रेखाटलेले आहे. पस्तीस ते चाळीस फुटांहून जास्त फुटाच्या बांबूला हा ध्वज लावला आहे.
येवल्यात साकारला महाकाय ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:10 IST