शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सूतगिरणीच्या जमिनीसाठी अडीच कोटींची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:17 IST

लोहोणेर : कसमादे पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या अवसायनातील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीची बागाईत क्षेत्र असलेली सुमारे २० एकर जमीन कोर्ट कारवाई करीत एकतर्फी लिलावात केवळ ९५ लाख रुपयांना विकण्यात आली; मात्र या जमिनीच्या फेरविक्रीबाबत मालेगाव येथील दिवाणी न्यायालयात सूतगिरणी कामगारांच्या संघटनेने आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने नवीन निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार नवीन इच्छुक खरेदीदारांनी ही जमीन २ कोटी ,५० लाख रुपयांपेक्षा जादा भावाने घेण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे, अशी माहिती दिनकर जाधव यांनी दिली़

ठळक मुद्देमालेगाव येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी

लोहोणेर : कसमादे पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या अवसायनातील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीची बागाईत क्षेत्र असलेली सुमारे २० एकर जमीन कोर्ट कारवाई करीत एकतर्फी लिलावात केवळ ९५ लाख रुपयांना विकण्यात आली; मात्र या जमिनीच्या फेरविक्रीबाबत मालेगाव येथील दिवाणी न्यायालयात सूतगिरणी कामगारांच्या संघटनेने आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने नवीन निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार नवीन इच्छुक खरेदीदारांनी ही जमीन २ कोटी ,५० लाख रुपयांपेक्षा जादा भावाने घेण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे, अशी माहिती दिनकर जाधव यांनी दिली़शुक्रवारी (दि. ७) मालेगाव येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दि. ३१ आॅगस्ट रोजी न्यायालयाने या जमिनीच्या फेरविक्रीसाठी इच्छुकांना आॅफर देण्याचे आवाहन कोर्टात केले होते. त्यास सोशल मीडिया व वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाल्याने अनेक शेतकरी व जमीन व्यावसायिकांनी न्यायालयात उपस्थित राहून किमान किमतीची आॅफर देऊन जाहीर लिलावाची मागणी केली आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील दिवाणी न्यायालय आवारात सदर जमिनीच्या खरेदीत भाग घेत इच्छुक खरेदीदार शेतकरी व व्यावसायिकांनी प्रतिज्ञापत्रच सादर केले. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध व्यावसायिक प्रल्हाद दगाजी सोनवणे, सुनील आहेर, अनिल तोरणे, योगेश पाटील, शिवाजी पंडितराव सोनवणे, भाऊसाहेब पगार, नंदलाल काशीनाथ निकम, मनोज आहिरे आदी शेतकऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २ कोटी पन्नास लाख रुपयांपर्यत लेखी आॅफर देऊन जाहीर लिलावाची बोली लावणेबाबत विनंती केली. ठेंगोडा सूतगिरणीकडे येथील कामगारांचे ५ कोटी रु पयांपेक्षा जादा घेणे आहे.