शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:31 IST

मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.

ठळक मुद्देरविवारी घडले दर्शन : शेतमजुरांसह रहिवाशांना खबरदारीचे आवाहन; वनविभागाकडून पिंजरा तैनात

नाशिक : मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या मौजे मानूर गावाच्या शिवारात छत्रपती शिवाजीनगर कॉलनीतील वस्तीलगत मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास बिबट्याने काही शेतमजुरांसह ऊसतोड कामगारांना दर्शन दिले. दरम्यान, सकाळी येथील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत पिंजरा लावण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी चर्चा करत तत्काळ वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांना पिंजरा लावण्याचे आदेश दिले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वस्तीलगत असलेल्या ऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात करण्यात आला.ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सूत्रांनीदेखील वर्तविली आहे. येथील ऊसशेतीच्या आजूबाजूला बिबट्याच्या पाऊलखुणाही वनकर्मचाऱ्यांना आढळून आल्या. यामुळे बिबट्याचा वावर असल्याचे शिक्कामोर्तब झाले. हा बिबट्या उसातलाच असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या अगोदर ऊसशेतीच्या परिसरातून निघून जावे. तसेच पहाटेदेखील ऊसशेतीच्या आजूबाजूला फिरकू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सूर्योेदय झाल्यानंतरच ऊसशेतीच्या जवळ जावे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळण्यास मदत होईल, असे भदाणे म्हणाले.परिसरात बिबट्याचे वास्तव्य असले तरी अद्याप बिबट्याने कोणत्याही व्यक्ती अथवा जनावरांवर हल्ला केला नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार