शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाऊराया ओवाळीते अन् विनविते तुला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:47 IST

‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतीर्थ’ या आश्रमाची कन्या आहे,

नाशिक : ‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतीर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, तिने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला युवासेनेचे आदित्य ठाकरे यांना राखी बांधून सरकारकडून आम्हा निराधार मुलांना ‘आधार’ मिळवून देण्याची विनवणी वजा ‘गिफ्ट’ मागितले.  शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वसंरक्षणार्थ उपाययोजना शिबिरप्रसंगी शनिवारी (दि.२५) शहरातील हनुमानवाडी लिंकरोडवरील एका लॉन्समध्ये आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ठाकरे यांनी आपल्या शैलीत विद्यार्थिनींच्या समूहात जाऊन ‘सेल्फी’ क्लिक केली. यावेळी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.  भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून राज्य सरकारकडे या आश्रमाच्या वतीने शासीकय अनुदान मंजूर होण्याबातचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र हा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकलेला आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांच्या मदतीवरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचा उदरनिर्वाह होत आहे. दानशुरांची मदत जरी होत असली तरी आश्रमातील मुला-मुलींची संख्या लक्षात घेता ती अपुरी पडते, अशी व्यथा पल्लवी पवार हिने यावेळी ठाकरे यांच्याशी संवाद साधताना मांडली.तसेच त्यांना हात जोडून विनवणी करीत सरकारदरबारी या समस्येचा तातडीने तोडगा काढण्याचे गाºहाणेही बहिणीच्या नात्याने त्यांच्याकडे केले. यावेळी त्यांचे औक्षण करून पल्लवीने ठाकरे यांच्या मनगटावर राखी बांधली.  ‘मी शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडिलांनी आत्महत्या केली आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. माझ्यासारखे माझे अनेक भाऊ-बहिणी आधारतीर्थ आश्रमात निवासी आहे. आमच्या आश्रमाच्या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, आपण लक्ष घालून ती मंजूर करून आम्हाला आधार द्यावा’ अशी हात जोडून पल्लवीने ठाकरे यांना विनवणी केली. यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaksha Bandhanरक्षाबंधन