शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:59 IST

मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.

शफीक शेख ।मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.आदित्यकुमार यांच्या वडीलांनी मजुरी करीत तर आईने भिक मागून उदरनिर्वाह करीत मुलाला बी. एस्सी पर्यंत शिकविले. अत्यंत कष्टात शिकलेल्या आदित्यकुमार यांनी कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता जिवनभर अविवाहित राहून ज्ञानदान करण्याचा संकल्प केला. हिंदी, इंग्रजी आणि गणित हे विषय संपूर्ण भारतात ते शिकवित आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाख १७ हजार कि. मी. प्रवास सायकलने केला असून २० राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ८ राज्यपालांनी त्यांचा सन्मान करुन ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव केला आहे.गेल्या २७ वर्षापासून आदित्यकुमार ज्ञानदानाचे काम करीत असून आतापर्यंत दोन लाख मुलांना त्यांनी शिकविले आहे. आपल्या कुटुंबियांप्रमाणे कुणी भिक मागू नये असा त्यांचा हेतू असून त्यांना संसद भवनाकडून हिरो आॅफ दि अ‍ॅवार्ड म्हणून गौरविले आहे. गुगलनेही त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा सन्मान केला आहे. आदित्यकुमार हे आॅल इंडिया सायकल गुरू म्हणून प्रसिद्ध असून श्रीमती लाँगश्री या त्यांच्या माता तर भूपनारायण हे त्यांच्या पित्याचे नाव आहे. रात्री फुटपाथवर किंवा मिळेल त्या जागेवर मुक्काम करुन मिळेल ते अन्नावर गुजराण करीत ज्ञानदान करीत आहेत. कानपूर येथील डी. ए. व्ही. कॉलेजमधून त्यांनी बी. एस्सी पदवी उत्तीर्ण केली आहे. पावसामुळे दौरा उशिराजूनमध्येच आदित्यकुमार महाराष्टÑात येणार होते; परंतु पावसाचे दिवस असल्याने ते जानेवारीत महाराष्टÑात आले. महाराष्टÑात मिळेल तिथे जे गरीबीमुळे शाळेत जावू न शकलेल्या ५० ते १०० मुलांना एकत्र करीत त्यांना शिकविण्याचे काम करतात. ग्रामीण भागात त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमते.