शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:14 IST

कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला.

नाशिक : कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला.समर्थ मंगल कार्यालयात अवर महिला मंडळाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात महानगराच्या विविध भागांमधून आलेल्या ३०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महानगरातील या महिलांच्या १४ गटांमध्ये स्पर्धा रंगल्या होत्या. या महिलांनी भुलाबाईच्या स्वरचित गाण्यांचे सादरीकरण केले. त्यानिमित्ताने विस्मृतीत जात असलेल्या भुलाबाईच्या उत्सवाची परंपरा कायम राखण्याचादेखील प्रयास करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या गटांना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, संस्थेच्या अध्यक्षा मानसी देशपांडे, सचिव रेवती कुरुंभट्टी, विभाकर कुरुंभट्टी आणि परीक्षक अनघा धोडपकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिन कुलकर्णी, प्रमोद पुराणिक आणि दीप्ती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अंजली शेवडे यांनी भुलाबाई उत्सवाची माहिती दिली. उत्कर्ष कुरुंभट्टी यांनी संस्थेची माहिती दिली. श्रुती देशपांडे यांनी प्रास्ताविक, प्रियांका गीत-पवार यांनी स्वागत तर स्नेहा पाटील यांनी आभार मानले. स्नेहल काळे आणि अंजली पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली. विजेत्या महिलांच्या तीन गटांना तसेच लकी ड्रॉद्वारे भाग्यवान ठरलेल्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

टॅग्स :Womenमहिलाcultureसांस्कृतिक