नांदगाव :मतदारसंघात आजपर्यंत सलग दोनदा कोणीही निवडून आले नाही. प्रत्येकवेळी परिवर्तन करणारा मतदारसंघ म्हणून आजपर्यंत या मतदारसंघाकडे बघितले गेले. त्यामुळे पंकज यांचा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.४तेराव्या फेरीत घड्याळाने कमळावर १४५१ मतांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या २३व्या फेरीपर्यंत अधिकाधिक होत राहिली. दरम्यान २२ व्या फेरीत धनुष्यबाणाने कमळावर आघाडी घेतली होती.४नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मनमाड शहरातील मतदारांच्या भूमिके वर जय पराजयाची गणिते अवलंबून असल्याचे बोलेले जाते. गेल्या चाळीस वर्षांपासून प्रत्येक निवडणूक ही शहराच्या पाणीप्रश्नाभोवती फिरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.