शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांची तोफ धडाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:57 IST

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे होत असलेल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पहिल्यांदाच अडीच वर्षांनंतर मार्गदर्शन करणार असल्याने या सभेच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या समर्थकांवर गर्दी जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेत भुजबळांची तोफ कोणावर धडाडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपुण्याला जाहीर सभा

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे होत असलेल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पहिल्यांदाच अडीच वर्षांनंतर मार्गदर्शन करणार असल्याने या सभेच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या समर्थकांवर गर्दी जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेत भुजबळांची तोफ कोणावर धडाडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी २६ महिने तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना विद्यमान सरकारने सूडबुद्धीने कारवाई करून डांबल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये असून, त्याविरोधात राज्यभर अनेकवार समर्थकांनी आंदोलने करून सरकार विरोधातील रोषही प्रकट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील कायदाच रद्द केल्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाआहे.अशा परिस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्टÑात काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ यात्रा समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे रविवारी दुपारी ४ वाजता शिंदे हायस्कूल मैदानावर जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याविषयी राज्यभर कुतूहलाचा विषय झाल्याने राष्टÑवादीने या जाहीरसभेच्या निमित्ताने भुजबळ यांना मैदानात उतरविण्याची राजकीय खेळी खेळली असून, पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाºया या जाहीरसभेचे मुख्य आकर्षण मात्र छगन भुजबळ हेच असणार आहे. शिवाय या सभेच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेला शक्तिप्रदर्शनाची आयती संधी मिळाली असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ‘चलो पुणे’ असे आवाहन भुजबळ समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे. नाशिक जिल्ह्णातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली असून, भुजबळ जाहीर सभेत काय बोलतात, याकडे साºयांचे लक्ष आहे.भुजबळ यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना मुंबई बाहेर पडण्यास मज्जाव केला असला तरी, भुजबळ यांची आगामी राजकीय भूमिका काय, या विषयी राज्यभरातील राजकारण्यांमध्ये व भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.