शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

येवला पालिकेतील रिक्त पदांसाठी भुजबळांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

येवला : येवला दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वपक्षीय नगरसेवकांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...

येवला : येवला दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वपक्षीय नगरसेवकांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पालिकेतील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत भुजबळ यांना साकडे घालण्यात आले.

उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली. प्रारंभी येवला शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव पालखेड आवर्तनाने टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर भरून दिल्याबद्दल भुजबळ यांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मागील वर्षापासून बदली झालेल्या संगणक अभियंता, विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता व नगर परिषद जलदाय, अग्निशमन, रचनाकार विभागातील श्रेणी अ, ब, क मिळून एकूण १६ पदे अद्याप रिक्त असून इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या कामकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे शहर विकासास अडचण येत असल्याने सदर पदे तातडीने भरण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी याबाबत पुढील कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते प्रवीण बनकर, अपक्ष गटनेते रूपेश लोणारी, संतोष परदेशी, मलिक शेख, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, शफिक शेख, अमजद शेख, निसार लिंबूवाले, सरोजिनी वखारे, छाया देसाई आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

फोटो- ०२ येवला पालिका

येवला येथील पालिकेच्या रिक्त पदांबाबत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवक.

020721\02nsk_36_02072021_13.jpg

फोटो- ०२ येवला पालिका येवला येथील पालिकेच्या रिक्त पदांबाबत छगन भुजबळ यांचेशी चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवक.