शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ ग्यानदासांच्या दारी

By admin | Updated: August 9, 2015 23:47 IST

सदिच्छा भेट : सिंहस्थ कुंभमेळा घरचे कार्य

भुजबळ ग्यानदासांच्या दारीसदिच्छा भेट : सिंहस्थ कुंभमेळा घरचे कार्यनाशिक : साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्णत्वास आली असताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्व नाशिककरांनी घरचे कार्य मानून यात सहभागी व्हावे. आपण सर्व यजमान असून, हजारो साधू-महंत आणि लाखोंच्या संख्यने येणारे भाविक हे आपले अतिथी आहेत. तपोवनातील मकवाना यांच्या निवासस्थानी ग्यानदास महाराज सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी थांबले असून, या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी रोज लोकप्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने येतात. छगन भुजबळ यांनी ग्यानदास महाराजांची सदिच्छा भेट घेऊन आपणास काही अडचणी आहेत काय, असे विचारले असता ग्यानदास महाराज म्हणाले की ‘कोयी समस्या नही, सब कुछ अच्छा चल रहा है; सभी सुविधा प्राप्त हो रही है’ असे सांगितले.याप्रसंगी भुजबळ म्हणाले की, आपण नाशिककर लोक भाग्यवान आहोत, कारण संपूर्ण विश्वात फक्त चार ठिकाणी कुंभ होतो. त्यात नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून, सिंहस्थामुळे लाखो भाविक येणार असल्याने शेकडो कोटींची उलाढाल होईल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. सर्वांनी पक्ष, धर्म, जात तसेच सर्व मतभेद बाजूला ठेवून या सोहळ्यासाठी सेवा दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी महंत भक्तिचरणदास, आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, धनंजय बेळे आदिंसह लोकप्रतिनिधी अधिकारी व महंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)सिंहस्थातील प्रशासकीय कामे चांगली झाली असून, सर्वांचे सहकार्य मिळत आहे. तसेच नाशिककर लोक पुण्यवान असून, या पुण्यभूमीत साधू-संतांचा मोठा सन्मान होतो. नाशिकमध्ये वसंतऋतूचा कायम वास असतो. म्हणून कोकीळ पक्षी कोणत्याही ऋतूत येथे गातो.- महंत ग्यानदास