शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:49 IST

नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला.

ठळक मुद्देन्यायालयीन लढाई सुरू असल्याने अखेरीस शुक्रवारी जामिनाचा निर्णय ढोल-ताशा वाजवत फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले

नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. भुजबळ फार्म तसेच राष्ट्रवादी भवनासह सिडको परिसरातील विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून तसेच पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच भुजबळ यांच्या जामिनावरील सुटकेची शक्यता वर्तवली जात होती. न्यायालयीन लढाई सुरू असल्याने अखेरीस शुक्रवारी (दि. ४) जामिनाचा निर्णय झाला आणि भुजबळ समर्थक तसेच स्थानिक राष्टÑवादी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन केल्याचे समजताच गेल्या दोन वर्षांपासून शांत असलेल्या सिडकोतील भुजबळ फार्म येथे राष्टÑवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ढोल-ताशा वाजवत फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, नाना महाले, जयंत जाधव, सुनील वाजे, आनंद सोनवणे, विजय देवरे, संतोष सोनपसारे, गजानन शेलार, गुरुमित बग्गा, निवृत्ती अरिंगळे, किशोर घाटे, मकरंद सोमवंशी, कुणाल बागडे, अमोल नाईक,अतुल भामरे, नंदन भास्कर, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, योगेश कमोद, बाळासाहेब कर्डक, भालचंद्र भुजबळ, अप्पा कमोद, अमर वझरे, मुक्तार शेख, तात्या जगझाप, दशरथ खेडकर, ज्ञानेश्वर महाजन, समाधान जेजुरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सिडको परिसरात जल्लोष, पेढेवाटपसिडको परिसरातील राष्टÑवादी कार्यालय, राणेनगर, त्रिमूर्ती चौक, पवननगर आदीसह सिडको व अंबड परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला, तसेच पेढ वाटप करण्यात आले. राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने कार्याध्यक्ष वैभव देवरे यांनी राणेनगर येथे ढोल-ताशे वाजवत फटाके फोडून मिठाई वाटप केली. याप्रसंगी गणेश जाधव, रवींद्र गामणे, डॉ. शिरोडे, मिलिंद भामरे, हर्षल चव्हाण, निखिल पवार ,राहुल पाटील, अजय गोसावी आदी उपस्थित होते.राष्ट्रवादी कार्यालयराणा प्रताप चौक, जिव्हाळा संकुल येथील राष्टÑवादी कार्यालय येथे प्रदेश सरचिटणीस नाना महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, अमोल महाले, सोमनाथ बोराडे, पुष्पा आव्हाड, विशाल डोके, कुणाल बागडे, मुकेश शेवाळे, रवींद्र शिंदे, गिरीश पवार, भूषण देव, प्रतिभा भुजबळ, अक्षय विभुते, संगीता चौधरी, संगीता गांगुर्डे, निशा दोंदे, कामिनी वाघ, हीना शेख, मंगला मोरे, परविन मनियार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.