मनपाच्या एकूण साडेसात हजार कर्मचाऱ्यांपैकी अडीच हजारांच्या आसपास कर्मचारी हे सेवानिवृत्त व मृत झाल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा ताण येत आहे. शासनाकडे मनपाने कर्मचारी आकृतिबंध मंजुरीसाठी पाठविलेला असून त्यास बराच कालावधी लोटला असल्याने त्यास अद्यापपर्यंत मंजुरी न मिळाल्याने कर्मचारी भरतीप्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे आकृतिबंध तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. आकृतिबंध मंजुरीसाठी लवकरच नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करून कर्मचारी भरतीप्रक्रियेस चालना देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील तसेच डॉ. कैलास कमोद व शैलेश जुन्नरे हे उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटोवर ३० भुजबळ नावाने सेव्ह. महापालिकेच्या कर्मचारी आकृतिबंधाला मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत सतीश सोनवणे व जगदीश पाटील.
===Photopath===
300121\30nsk_24_30012021_13.jpg
===Caption===
भुजबळ नावाने सेव्ह. महापालिकेच्या कर्मचारी आकृतीबंधाला मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत सतीश सोनवणे व जगदीश पाटील.