शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ फार्म, ‘चंद्राई’चे मूल्यांकन सुरूच

By admin | Updated: August 24, 2016 01:17 IST

सलग दुसरा दिवस : तपासी प्रक्रिया आठवडाभर चालणार

नाशिक : बेहिशेबी मालमत्ता असल्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म व निवासस्थानांच्या परिसराच्या एकूण क्षेत्रफळाची मंगळवारी (दि. २३) दुसऱ्या दिवशीही मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेत भुजबळांच्या ‘चंद्राई’ बंगल्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया राबविली. विविधअंगी मूल्यांकनाची प्रक्रिया किमान आठवडाभर चालणार असल्याचे समजते. ज्ञात उत्पन्न स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आल्यामुळे मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाले आहेत. या आदेशानुसार सोमवारपासून (दि.२२) सिडको येथील भुजबळ फार्म व येथील जुन्या-नव्या बंगल्यांचे क्षेत्र आणि तेथील विविध वस्तूंचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मूल्यांकनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली आहे. दाखल गुन्ह्णाच्या तपासाचा एक भाग म्हणून मूल्यांकनाची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती भुजबळ यांचे वकील अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी सांगितले.महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदि प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्णांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. भुजबळ यांची सखोल चौकशी केल्यानंतर भारतीय दंड विधान १९/१ काळापैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ते अटकेत आहे.मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक भुजबळ फार्मवर पोहोचले. तब्बल दोन ते अडीच तास भुजबळ यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू होते. यावेळी प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले होते. केवळ काही देखरेख करणारे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.अचूक किंमत शोधण्याचा निश्चयगोविंदनगर भागातील आलिशान ‘भुजबळ फार्म’च्या शंभर कोटींचे कथित मूल्यांकन असलेल्या मालमत्तेची अचूक किंमत शोधून काढण्याचा निश्चय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेत सोमवारपासूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांच्या फार्मचा ताबा घेतला आहे. मंगळवारीही तीन तास फार्म परिसराच्या क्षेत्रफळासह संपूर्ण गृहसजावटींच्या वस्तूंपासून तर लाकडी फर्निचरची तपासणी करण्यात करण्यात येत आहे. बांधकाम रचना पडताळून बघण्यासाठी काही वास्तुविशारदांचीही मदत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते.दगड, माती, लाकूड, झुडूपांची तपासणीप्रत्यक्षात दाखविलेल्या भुजबळांच्या महालाची किंमत आणि प्रत्यक्षात बाजारमुल्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे सुत्रांकडून समजते. भुजबळांनी महाल उभारण्यासाठी वापरलेला आगळावेगळा दगड, माती, लाकूड आणि सजावटीसाठी लावलेले परदेशी प्रजातीचे महागडे झुडूप अशा सर्वच बाबींचे मुल्यांकन सध्या दोन दिवसांपासून सुरू आहे. आलिशाान महाल व तेथील इंटेरिअर आणि विविध वस्तू परदेशांमधून आणल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला संशय असल्याने इलेक्ट्रिक, कृषी, वास्तुविशारद आदि क्षेत्रांमधील तज्ज्ञांना पाचारण करुन मोजदाद केली जात आहे. मातीपासून मफलरपर्यंत सर्वच बाबींची ‘किंमत’ अधिकाऱ्यांकडून ठरविली जात आहे. विद्युत व्यवस्थेचीही पडताळणीइलेक्ट्रिकल क्षेत्राच्या तज्ज्ञांना पाचारण करून मंगळवारी भुजबळ फार्म, चंद्राई बंगल्यामध्ये करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत व्यवस्था पडताळण्यात आली. यावेळी भुजबळांनी ‘प्रकाश’ पाडण्यासाठी वापरलेल्या विविध महागड्या दिव्यांपासून तर आवार सुशोभित करण्यासाठी लॉन्स व महागडे परदेशी रोपट्यांपर्यंत फेरमूल्यांकन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.