शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा सल्ला डावलून बससेवेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:28 IST

नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.

ठळक मुद्देसूचनेकडे दुर्लक्ष : ठेकेदारांना लेटर आॅफ अवॉर्ड

नाशिक : नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे.शहर बस वाहतूक सुरू करण्याचे प्रस्ताव आत्तापर्यंत सहा वेळा फेटाळण्यात आले होते. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना सरकार असताना त्यांनी हा प्रस्ताव पाठविला आणि महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना तो मंजूर करावा लागला. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्याशिवाय परिवहन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा फार तर मार्च महिन्यात ही सेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या मेट्रो आणि बससेवेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.नागपूरला मेट्रो रिकाम्या धावत असताना नाशिकमध्ये अशी सेवा कितपत उपयुक्त असा प्रश्न त्यांनी केला होता. तसेच बससेवा कायम तोट्यात जाणारी असल्याने त्यासाठी नाशिककरांवर बोजा लादू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने दोन ठेकेदारांना लेटर आॅफ अवॉर्ड दिले आहे. यात ट्रॅव्हलटाईम कार रेन्टल प्रा.लि. या ठेकेदार कंपनीला १२० सीएनजी आणि ३० डिझेल बसेस पुरवण्याचे तर सिटी लाइफलाइन या ठेकेदार कंपनीला ८० सीएनजी आणि वीस डिझेल बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.अगोदरच कल्पना देण्यात आली होती...गेल्या सोमवारी (दि.२०) छगन भुजबळ यांची महापौर सतीश कुलकर्णी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या सेवेचा विचार करण्याबाबत फेरविचार करण्याची चर्चा झाली असली तरी बससेवेसाठी निविदा मागवून ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. या सेवेसाठी खूपच पुढे गेले असल्याने माघार घेणे कठीण असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका