ठळक मुद्देवाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सरपंच भारती खिरारी व ग्रामस्थांनी केली
ठाणापाडा : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिदुर्गम भागातील शिरसगाव, हेदपाडा, भूतमोखाडा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दरड, झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
तेथील वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सरपंच भारती खिरारी व ग्रामस्थांनी केली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना आनंदाचे व समाधानकारक वातावरण आहे. या परिसरातील नदी-नाल्यांना पूर आल्याने रस्ता व शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
भूतमोखाडा या गावाला कुठलाही पर्यायी मार्ग, नसल्याने आजारी रुग्णांना, शासकीय कामासाठी रस्ता तात्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. (२२ ठाणापाडा १, २)