शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

भूतानच्या जवानाने ‘कॅट्स’मध्ये गिरविले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:30 IST

भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मध्ये (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे धडे गिरवित होते.

नाशिक : भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मध्ये (कॅट्स) लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे धडे गिरवित होते.भारताकडे आधुनिक एव्हिएशनची क्षमता असून, येथील चित्ता, चेतक हेलिकॉप्टरचा सरावादरम्यान आलेला अनुभव खूप काही शिकवून गेल्याचे मत थिन्नले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कॅट्सच्या हवाई तळावर शुक्रवारी वैमानिकांच्या ३० व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी एकूण ४० प्रशिक्षणार्थी वैमानिकांना ‘एव्हिएशन विंग’ कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यादरम्यान, थिन्नले यांनाही प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीसोबत थिन्नले यांनीही संचलन करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना दिली.सोहळ्यानंतर थिन्नले यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारतीय सेना आधुनिकतेकडे गतिमान असून, भूतान राष्टÑही त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधाला ५० वर्षे पूर्ण होत असून, मला आनंद होत आहे, असे ते म्हणाले.चार जवान बनले वैमानिकभूतानने अद्याप एव्हिएशन प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले नाही. आमच्या सेनेकडून काही जवानांना या प्रशिक्षणाची संधी मिळते, असे थिन्नले यांनी सांगितले. भूतानच्या संरक्षणासाठी मला भारतात घेतलेल्या या प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी व येथे सहकारी प्रशिक्षणार्थींकडून मिळालेली आदराची, सन्मानाची वागणूक अविस्मरणीय अशीच असल्याचे थिन्नले म्हणाले. आतापर्यंत भूतानच्या चार जवानांनी भारतात या प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.हेलिकॉप्टरसोबत सपत्निक सेल्फी सेशनदीक्षांत सोहळ्यासाठी थिन्नले यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडीच्या चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरसोबत ‘सेल्फी’ क्लिक केली. दरम्यान, थिन्नले यांनी त्यांच्या पत्नीलाही हेलिकॉप्टरची ओळख करून देत प्रशिक्षण कालावधीदरम्यानच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. सोहळ्यानंतर सहकारी जवानांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानairforceहवाईदल