शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून भोंदूबाबाला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:51 IST

नाशिक : सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका भोंदूबाबासह तिघांनी जादूटोण्याने ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन पिटाळून लावल्याचा प्रकार शनिवारी (दि.१६) यशवंतनगर येथे उघडकीस आला आहे. ग्रामस्थांनी भोंदूबाबाची कार पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसटाणा : यशवंतनगर ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रकार; गुन्हा दाखल

नाशिक : सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका भोंदूबाबासह तिघांनी जादूटोण्याने ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन पिटाळून लावल्याचा प्रकार शनिवारी (दि.१६) यशवंतनगर येथे उघडकीस आला आहे. ग्रामस्थांनी भोंदूबाबाची कार पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.यशवंतनगर ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडत असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कारमधून एका भोंदूबाबासह त्याच्या तीन शिष्यांचे गावात आगमन झाले. गावात आलेल्या भोंदूंनी मतदान केंद्राच्या परिसरात अघोरी जादूटोणा करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांत एकच घबराट निर्माण झाली. भोंदूंच्या तंत्रमंत्राच्या जयघोषमुळे अचानक दोन ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांच्या भीतीत अधिक भर पडून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान या भोंदूबाबाला गावातीलच एका पॅनलप्रमुखाने आमंत्रित केले होते, अशी गावात चर्चा सुरू झाल्याने विरोधी पॅनलच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा थेट भोंदूबाबा आणि त्याच्या शिष्यांचा सुरू असलेल्या मंत्र घोषाच्या ठिकाणी वळवीत हल्ला चढवला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चौघांना बदडून काढले. यावेळी चौघांनी पळ काढला. ग्रामस्थांनी भोंदूबाबाची कार पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली असून, या जादूटोण्याच्या प्रकाराविरुद्ध सटाणा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

कोण आहे भोंदूबाबा...यशवंतनगरच्या ग्रामस्थांनी चोप दिलेल्या हा भोंदूबाबा व त्याचे शिष्य देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील असून त्याचा मठ पुढाऱ्यांचा अड्डा असल्याचे बोलले जाते. देवळा तालुक्यातील एका पुढाऱ्याला जिल्हा परिषद निवडणूक जिंकून दिल्याने त्याने चक्क बाबाला आलिशान कार भेट दिली असून तिच्यावर जय महाकाय, असे नाव टाकले आहे. त्याच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, रायगड येथील भक्तगण या भोंदूचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दिवसाढवळ्या कायद्याचे उल्लंघन करून अंधश्रद्धेला खुलेआम खतपाणी घालणाऱ्या या भोंदूबाबाने एका अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाच खुले आव्हान दिले आहे. सटाणा पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकPolice Stationपोलीस ठाणे