शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

जैवविविधतेची जोपासना करणारा ‘भोकर‘

By admin | Updated: July 3, 2014 00:10 IST

जैवविविधतेची जोपासना करणारा ‘भोकर‘

 

नाशिक, दि. ०२ - कोकिळा, साळूंकी, दयाळ, ब्राम्हणी मैना, जंगली मैना, पोपट, लालबुड्या बुलबुल, कोतवाल, चिमण्या आदि पक्ष्यांचा भोकर हा आवडता वृक्ष आहे. भोकर वृक्षावर लहान-लहान किटकही पोसले जातात व या पक्ष्यांनाही खाण्यासाठी काही पक्षी येतात. पावसाळ्याच्या प्रारंभी भोकरची फळे पिकल्यानंतर पक्ष्यांची संख्या अधिकच वाढते. भोकरच्या फळांचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अत्यंत गुणकारी व औषधी असतात. भारतीय प्रजातीची वृक्ष औषधी तर असतातच; मात्र जैवविविधतेची जोपासणा करण्यासाठीही पुरक ठरतात. त्यापैकी भोकर हा एक वृक्ष आहे. तत्पुर्वी फुलोरा फुलल्यानंतर मधमशांच्याही पसंतीस हे झाड खरे उतरते. फुलांना असलेला मंद सुगंध हा परिसरात दरवळतो. शहरात भोकरचा वृक्ष कमी प्रमाणात आढळतो. या पावसाळ्यामध्ये नव्याने उदयास येणाऱ्या कॉलन्यांमध्ये तसेच मोकळ्या भुखंडांवर या वृक्षाच्या रोपांची लागवडीवर भर देण्याची गरज हवी. भोकर हा वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा आहे. हा वृक्ष निसर्गाचा खरा दागिना असलेल्या पक्ष्यांना पोसण्याचे अनमोल कार्य करतो. तसेच मधमाशासारख्या किटकांनाही या वृक्षाला उन्हाळ्यामध्ये येणारा फुलोरा मधमाशांची भुक भागवितो तसेच सभोवतालचा परिसर सुगंधाने दरवळून निघतो. भोकर वृक्षाला मुख्य फांद्या, उपफांद्या सर्वाधिक प्रमाणात असल्यामुळे या वृक्षाची घनदाट सावली पडते. भोकरच्या फळांना ‘गुंद’ असे ही म्हटले जातात. ही फळे पिकल्यानंतर बाजारात विक्रीसाठीही येतात. कोकणातल्या लोकांचे तसेच गुजराथी बांधवांचे हे आवडते खाद्य. कारण या फळांपासून हे लोक उत्तम प्रकारे लोणचं तयार करून तोंडी लावतात. या फळांमार्फतच भोकरच्या प्रजातीचा बीजप्रसार होतो. फळे मध्यम गोड चवीचे असतात. त्यामधील गर हा चिकट असतो. आयुर्वेदात या फळांना अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. भोकराच्या पानांचाही औषधी उपयोग केला जातो. असा हा भोकर अत्यंत गुणकारी व जैवविविधता जोपासणा करणारा पर्यावरणपुरक भारतीय प्रजातीचा वृक्ष आहे....असा आहे भोकर वृक्षभोकर हा पर्यावरणपुरक वृक्ष मध्यम आकाराचा वाढणारा देशी वृक्ष आहे. हा वृक्ष शहरात अत्यंत दुर्मीळ असाच झाला आहे. क्वचित काही ठिकाणी हा वृक्ष आढळून येतो. भोकरचा वृक्ष शहरातील महापालिकेच्या मोकळ्या भुखंडांमध्ये तसेच विविध रस्त्यांच्या कडेला लावल्यास देशी वृक्षाच्या संवर्धनाबरोबरच जैवविविधता देखील राखली जाईल. या वृक्षाच्या बुंध्याचा व्यास एक ते दीड मीटरपर्यंत होतो. या वृक्षाला उन्हाळ्यात फुलोरा येतो व या फुलांना मंद सुगंधही असतो. बोराच्या आकाराची हिरव्यागार फळांनी हे झाड बहरून निघते. पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान, ही फ ळे पिकतात व फिकट लालसर रंगाची होतात. हा वृक्ष पानझडी वृक्ष प्रजातीमधील असला तरी दीर्घकाळ भोकरचा वृक्ष निष्पर्ण राहत नाही. या वृक्षाला निसर्गाने मुख्य फांद्या व उपफांद्यांचे अनोखे वरदान दिले आहे....असा आहे फळांचा औषधी उपयोगभोकरच्या फळांचे लोणचे तर केले जाते. व या फळांना गुंद असेही नाव आहे. सदर फळे आयुर्वेदामधील उत्तम औषध आहे. कफदोष निवारण्यासाठी ही फळे अत्यंत गुणकारी आहे. तसेच लघवीमध्ये होणारी जळजळ, जुलाब थांबविण्यासाठी या फळांचा काढा करून दिला जातो. हलका ताप, सांधेदुखी या आजारावरही सदर फळे गुणकारी ठरतात. तसेच या वृक्षाच पानांचा देखील औषधी उपयोग केला जातो. त्यामुळे या वृक्षाच्या लागवडीची अत्यंत गरज आहे. या वृक्षाची रोपे काही महिन्यानंतर वेगाने वाढताना दिसतात. विविध उद्यानांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या भुखंडांवर हे झाड लावण्यास क ाहीही हरकत नाही. खारूताईचा देखील हा आवडता वृक्ष आहे. पिकलेले भोकरची फळं खाण्यासाठी खारूतार्इंची वृक्षावर गर्दी होते.