शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिभूमीवर भीमसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:53 IST

शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८२वा वर्धापन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करीत मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्र म आयोजित केले. राज्यभरातून आलेले लाखो समाजबांधव येथे हजेरी लावून नतमस्तक झाले.

येवला : शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८२वा वर्धापन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करीत मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्र म आयोजित केले. राज्यभरातून आलेले लाखो समाजबांधव येथे हजेरी लावून नतमस्तक झाले.  मुक्तिभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला. महामानवाला भीमसैनिकांनी अभिवादन केले. डॉ. आंबेडकर स्मारकात सकाळपासूनच दर्शनासाठी बौद्ध बांधव, महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी दर्शन घेतले. निळा ध्वज हातात घेऊन जयभीमचा जयघोष करीत हजारो बांधव मुक्तिभूमीकडे दाखल झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता राष्ट्रीय प्रवक्ते भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भिक्खू संघाच्या वतीने मुक्तिभुमी ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संपूर्ण शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत श्रामनेर भिक्खू संघासह बौद्ध बांधव सहभागी झाले होते. मुक्तिभूमी येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील आंबेडकरी संघटनांसह रिपाइंच्या वतीने भोजनदान, चहा-पाणी, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. भीमगर्जना मित्रमंडळाच्या वतीने चहा- पाणी व्यवस्था करण्यात आली. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एन. एम. आगाणे, वसंतराव पराड, वि. म. रूपवते, संजय खंडीझोड, भगवान साबळे, अनिकराव गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुक्तिभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे स्टॉल्स, विविध वस्तू विविध प्रकारच्या मूर्तींसह विविध वस्तूंची दुकाने लावण्यात आली होती.सकाळपासूनच येवला विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाऊले चालती मुक्तीभूमीची वाट म्हणत लाखो दलित बांधव मुक्तीभूमीवर नतमस्तक झाले. संभाजीराजे पवार, अ‍ॅड.माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, डॉ,दिलीप मेनकर, नरेशकुमार बहिरम, डॉ.राहुल खाडे, बाळासाहेब लोखंडे,दिपक लोणारी, रिपांईचे गुड्डु जावळे, राजेंद्र लोणारी, सुभाष गांगुर्डे,सुनील पैठणकर, धनंजय कुलकर्णी,महेश आहेर यांनी पुष्पहार अर्पण केला.प्रा. शरद शेजवळ यांच्यासह प्रतिष्ठानच्या कलाकारांनी क्र ांतीगिते सादर करून बाबासाहेबांची महती जनतेसमोर सादर केली. भारतीय बौध्द महासभेच्यावतीने शहरातील मुक्तिभूमी ते विंचुर चौफुली पर्यंत रॅली काढण्यात आली. ज्या मैदानावर बाबासाहेबांनी धर्मातंराची घोषणा केली त्या मुक्तिभूमी येथील मैदानावर ध्वजारोहण व क्र ांतीस्तंभाला आंबेडकरी जनतेसह अनेकांनी पुष्पहार अर्पण केला. ब्लू पंथर चे संस्थापक सुभाष गांगुर्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोफत सरबताचे याशिवाय अनेकांनी अन्नदानासाठी परिसरात राहुट्या उभ्या केल्या होत्या. पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, शहर पो.नी. संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक रु पचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे मुक्तिभूमीला छावणी चे स्वरूप आले होते.