शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:12 IST

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी.

ठळक मुद्देतहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजनपोलिसांचे कामदेखील कमी होईल

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी. यासाठी प्रशासन सर्व बाबतीत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन भीमराज दराडे यांनी येथे केले. ग्रामीण शेतशिवारातील कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेची माहिती देण्यासाठी येथील महात्मा फुले नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे होते. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, येवला उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक संस्थेच्या विनीता वाघ, सारिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी, पालकमंत्री योजनेंतर्गत शेतशिवारातील रस्ते झाले तर गावे तंटामुक्त होण्यास मदत होईल. पोलिसांचे कामदेखील कमी होईल. न्यायालयीन कामकाजातील शेतबांध व रस्ते यावरून असलेले वाद निकालात निघतील, असे मत मांडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गटविकास अधिकारी सुनील अहिरे, उपअभियंता वाघ, जलसंधारणच्या सहायक कार्यकारी अभियंता सोनल पाटील, बाळासाहेब लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख, नायब तहसीलदार सविता पठारे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मजूर फेडरेशनचे माजी संचालक गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांना पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजनेची प्रत्येक गावात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी संतोष तरटे, उत्तम खांडवे, शरद घाडगे, आनंद शंकपाळ, विजय चव्हाण, विशाल राऊत, विलास साबळे, रमेश कुंभार्डे, सुधीर पाटसकर यांनी परिश्रम घेतले. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी आभार मानले.