शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:32 IST

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : पुनर्वसनाच्या प्रश्नावर आक्रमक

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.भाम धरणाची यंदा घळभरणी करण्यात आली असून, धरणात शंभर टक्के पाणी साठले आहे. तत्पूर्वी ४८० भाम धरणग्रस्तांचे मे महिन्यात भरवज-निरपण येथे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात आले. आता मात्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, धरण पूर्णपणे भरल्याने धरणाच्या खालच्या बाजूला करण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या घरांमध्ये जमिनीखालून पाण्याचे झरे निघू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु अजूनही नळांना पाणी येत नाही, त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनही महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यानंतर त्यांनी पुनर्वसन कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. काही ठिकाणी हातपंप करण्यात आले, परंतु ते नादुरुस्त आहेत. गटारींचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी वाहून जाण्याची सोय नाही. रस्तादेखील मातीचा असून, घोटी ते भरवज-निरपण हा नवीन रस्ता तयार करण्यात यावा, शेतजमिनीत बांधलेल्या घरासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचा दारिद्र्यरेषेत समावेश करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.