शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भिकमसिंह राजपूत हटाव मोहिमेसाठी धरणे

By admin | Updated: May 21, 2014 00:28 IST

पशुवैद्यकीय राजपत्रित संघटनेची मागणी

पशुवैद्यकीय राजपत्रित संघटनेची मागणीनाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली अनावश्यक खरेदी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निधीच्या उपलब्धतेनुसार औषध खरेदी न करता ती आवश्यक त्या मागणीनुसारच झाली पाहिजे; मात्र जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे थेट जिल्हा पातळीवरून औषध खरेदी करण्यात येते. तालुका स्तरावरून मागणी नोंदविण्यात येत नाही. तालुका स्तरावरून मागणी एकत्रित करून तालुकानिहाय मागणी जिल्हा स्तरावर पाठविणे आवश्यक असताना, सरसकट जिल्हा स्तरावरून औषधे व लस खरेेदीची प्रक्रिया राबविण्यात येते. तसेच मागणी पत्रकात नमूद केल्याव्यतिरिक्त औषधांची खरेदी किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असलेली किंवा अनावश्यक औषधे संस्थांनी (पशुवैद्यकीय दवाखान्यांनी) स्वीकारू नयेत, अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत त्याचेही पालन केले जावे. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी डॉ. चोपडे व डॉ. निकम यांच्या बदल्या व प्रतिनियुक्त्या तसेच त्यांच्याकडे दिलेला अतिरिक्त पदभार, त्याप्रमाणेच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजेचे अर्ज असताना त्यांचे विनावेतन करणे यांसह कामकाजातील अन्य मनमानी कारभाराला पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी वैतागले असून, त्यांच्या संदर्भात प्रशासनाने आवश्यक ती ठोस कारवाई करावी आदि मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. महाजन, डॉ. देशमुख, डॉ. चांदोरे, डॉ. ठाकूर, डॉ. ताडगे, डॉ. चौधरी, डॉ. पगार, डॉ. मोरे, डॉ. पझई आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)