शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजी यांना न्यायालय पुन्हा धाडणार समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:27 IST

नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी शुक्रवारी (दि़ २८) दिले़ या समन्सनुसार येत्या १२ आॅक्टोबरला भिडे यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे़

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी शुक्रवारी (दि़ २८) दिले़ या समन्सनुसार येत्या १२ आॅक्टोबरला भिडे यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे़ भिडे गुरुजी यांच्याविरोधात नाशिक महापालिकेने खटला दाखल केला असून, त्यावरील सुनावणीत हे आदेश देण्यात आले़  न्यायाधीश पांडे हे रजेवर असल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांच्या न्यायालयात सुनावणी होती़ मात्र, भिडे आजही न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात समन्स काढण्याचे आदेश धांडे यांनी आदेश देत २८ सप्टेंबर ही तारीख ठेवली होती़ मात्र, न्यायालयाचे समन्स भिडे गुरुजींपर्यंत पोहोचले नसल्याचे न्यायालयास स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या १२ आॅक्टोबरला न्यायालयासमोर हजर राहण्याचे दुसºयांदा समन्स काढण्यात आले आहे़१० जून रोजी नाशिकमधील सभेत आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ या वक्तव्याबाबत ‘लेक लाडकी अभियान’तर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले.  परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला़भिडे दोन्ही तारखांना अनुपस्थितप्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, ७ आॅगस्ट रोजी प्रथम सुनावणीसाठी ठेवले होते़ यानंतर १० आॅगस्ट, २४ आॅगस्ट या दोन्ही तारखांना भिडे न्यायालयात हजर राहिले नाहीत़ भिडे यांनी न्यायालयात हजर राहावे यासाठी ३१ आॅगस्ट ही तारीख ठेवण्यात आली होती़

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी