घोटी : संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेले भावली धरण पूर्ण भरल्याने आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.दारणा नदीच्या उगमस्थानी असलेले हे धरण मागील आठवड्यातच भरले आहे. आज आमदार निर्मला गावित यांनी जलपूजन केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, राजेंद्र जाधव, तात्या भांगडे, पांडुरंग शिंदे, संपतराव काळे, भास्कर गुंजाळ, बाळासाहेब वालझाडे, मधुकर कोकणे, ज्ञानेश्वर खातळे, सोमनाथ लंगडे, राजेंद्र जाधव, गुलाब वाजे, भाऊसाहेब धोंगडे, निवृत्ती खातळे, स्वीय सहाय्यक योगेश चोथे, ज्ञानेश्वर तोकडे, राजेंद्र भटाटे,सुभाष गिते, बेबी भागडे, लहू भागडे, गोविंद चव्हाण, हरी भागडे, सुरेश गटार, गणेश कडू, ज्ञानेश्वर कडू, गोपाळ भगत आदि पदाधिकाऱ्यांसह नाशिक शाखा अभियंता एस. के. मिसाळ उपस्थित होते. (वार्ताहर)
भावली धरण फुल्ल !
By admin | Updated: July 30, 2016 21:21 IST