शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भालेकर शाळा भाड्याने देण्याचा घाट

By admin | Updated: April 22, 2017 00:59 IST

नाशिक : महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी काही अविचारी निर्णयही घेण्यास सुरुवात केली आहे

 नाशिक : खालावलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी काही अविचारी निर्णयही घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिका शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारणेसाठी डोके लढविण्याऐवजी या शाळाच खासगी शिक्षण संस्थांच्या घशात घालण्याचा उद्योग केला जात आहे. मनपाच्या बी. डी. भालेकर हायस्कूलच्या इमारतीचा पहिला मजला खासगी शिक्षण संस्थांना भाड्याने देण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, भविष्यात मनपाच्या शाळेवरच गंडांतर येण्याची शक्यता आहे.महापालिकेमार्फत शालिमार येथे बी. डी. भालेकर माध्यमिक शाळा चालविली जाते. सदर शाळेत आसपासच्या झोपडपट्टीतील तसेच गोरगरीब-मध्यमवर्गीय कुटुंबीयांची मुले शिक्षण घेतात. सदर शाळेच्या दर्जा व गुणवत्तेकडे आजवर गांभीर्याने लक्ष न दिल्याने विद्यार्थी पटसंख्येत घट झालेली आहे. मध्यंतरी शाळाच बंद करून तेथील विद्यार्थ्यांना अन्य मनपाच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु काही स्वयंसेवी संस्थांनी मनपा प्रशासनाचा हा डाव हाणून पाडला होता. सद्यस्थितीत बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरविले जातात. याठिकाणी सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर इमारतीत तळमजल्यावर आठ खोल्या असून, पहिल्या मजल्यावरही आठ खोल्या आहेत. तळमजल्यावर विद्यार्थ्यांचे वर्ग भरतात तर पहिल्या मजल्यावर ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षणादी कार्यक्रमांसाठी सभागृह आहे. सदर शाळेचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मनपा प्रशासनाने आता भालेकर शाळा इमारतीतील संपूर्ण पहिला मजला भाड्याने देण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महापालिकेने त्यातून वार्षिक उत्पन्न सुमारे १३ लाख ३५ हजार रुपये तर प्रीमिअम रक्कम ५३ लाख ४३ हजार रुपये अपेक्षित धरली आहे. सदर पहिला मजला हा खासगी शिक्षण संस्थांना भाड्याने देण्यात येणार आहे. महापालिकेकडे त्यासाठी काही दोन-तीन शिक्षण संस्थांचे प्रस्ताव आल्याचे सांगितले जाते. त्यातच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने अशासकीय ठरावाद्वारे सदर जागेची मागणी देवळा येथील शिक्षण संस्थेसाठी केल्याचेही समोर आले आहे. महापालिका शिक्षण समितीने मात्र सदर जागा भाड्याने देण्यास नापसंती दर्शविल्याचे समजते.