शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला महामार्गावर भजन-कीर्तन

By admin | Updated: June 6, 2017 01:45 IST

चांदवड : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोेर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत चांदवडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथे शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी किसान क्रांती मोेर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत चांदवडमध्ये शंभर टक्के बंद पाळण्यात आला. सोमवारी चांदवडचा आठवडे बाजार असतो. चांदवडच्या इतिहासात पहिल्याच आठवडे बाजार बंद ठेवून किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ-मृदंगाच्या तालावर कीर्तन सादर करून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. आजच्या बंदमध्ये व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी, रिक्षाचालकांनी सहभाग नोंदविला. मात्र अत्यावश्यक सेवा मेडिकल्स व दवाखाने बंदमधून वगळण्यात आली होती. गेल्या पाच दिवसांपासून चांदवड तालुक्यात शेतकरी संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भाजीपाला व दुधाचा पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवून गावकऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास किसान क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गणेश निंबाळकर, राम बोरसे, समीर काळे, नितीन थोरे, प्रकाश चव्हाण, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन अहेर, संजय जाधव, शांताराम ठाकरे, युवा नेते राहुल कोतवाल, नवनाथ अहेर, अनिल कोतवाल, शिवाजी कासव, प्रकाश शेळके, किसान सभेचे अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, कॉ. भास्कर शिंदे, संपतराव जाधव, मारोती ठोंबरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गणेश ठाकरे, भाऊसाहेब शेलार, देवीदास शेलार, जगन्नाथ घुमरे, शंकरराव जाधव, बी. बी. देवरे, सुरेश निकम, सुभाष शिंदे, नंदकुमार कोतवाल, आदेश शेळके, सुभाष शेळके आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा सरकार डाव आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संजय जाधव, गणेश निंबाळकर, कॉ. भास्करराव शिंदे, नितीन अहेर यांची भाषणे झाली. शेतकरी क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दिशा राज्य व जिल्हास्तरावरून ज्या पद्धतीने आदेश येतील तसे आंदोलन करण्याचे ठरले. चांदवड बंदमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.