शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सिन्नर येथे उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

By admin | Updated: April 8, 2017 22:56 IST

सिन्नर : येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून सोमवारी (दि. १०) प्रारंभ होत आहे.

सिन्नर : येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून सोमवारी (दि. १०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी भल्या पहाटेपासून रथ व कावडी सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन मिरवणुकीस ढोल-ताशा व टाळ-मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार असून गंगावेस, लालचौक, महालक्ष्मी रोड, खडकपुरामार्गे शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरुन रथोत्सव व गंगाजलांच्या कावडींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथ मिरवणुकीपुढे त्र्यंबकबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी सहाला सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. शहरातील पाचोरे कुटुंबीयांकडे रथ हाकण्याचा मान असतो. रथाच्या दोन्ही बाजूने भालदार चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालतात. रथाला बैलजोड्या जुंपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ असते. बैलांना पोळा सणाप्रमाणे स्वच्छ धुवून व सजवून मिरवणूक मार्गावर सज्ज ठेवतात. रथामागे सहभागी झालेल्या कावडीधारकांच्या स्वागतासाठी पाट मांडण्यात येऊन त्यावर त्यांचे पाय धुवून पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच कावडीधारकांना गूळ-खोबरे, पेढे, साखरफुटाणे देण्यात येतात. संपूर्ण गावापासून सूर्यास्तापर्यंत भैरवनाथ पटांगणात येते. याठिकाणी कावडीधारकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते.कावडीतील गोदावरीच्या पाण्याने भैरवनाथ मूर्तीस अभिषेक घातला जातो. मंदिराभोवती दिव्यांची रोषणाई करण्यात येते. मुला-मुलींसाठी खेळणी व मिठाईची दूकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. यात्रा म्हणजे सिन्नरकर नातेवाईक व मित्रमंडळींना वर्षातून एकदा भेटण्यासाठीचा योग जुळवणारे जणू संमेलनच असते. घरोघरी आलेले पाहुणे आणि मित्रांच्या स्रेहभेटींनी या यात्रेला वेगळेच परिमाण लाभले. त्यास लाभलेल्या भक्तीच्या कोंदणात सिन्नरनगरीतले रस्ते रांगोळ्यांनी सजले जातात. विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक मंडळांकडून कावडी धारकांसाठी अल्पोपहार, सरबताची व्यवस्था करण्यात येते. रथामागे असलेल्या कावडीधारकांचे पदप्रक्षालन व प्रसाद वाटपासाठी मोठी गर्दी होते. कावडीधारकांना ओल्या नारळाचे खोबरे, गुळ, पेढे प्रसाद म्हणून देण्यात येतो. रथामागे कावडी घेऊन पायी चालणाऱ्या कावडीधारकांना भाविकांकडून सरबत तसेच प्रसादाचे वाटप केले जाते. सकाळी सहाच्या सुमारास सुरु झालेली रथ मिरवणूक दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवरुन मार्गक्रमण करीत सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात रथ मिरवणूकीची सांगता झाल्यावर सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात मोठी यात्रा भरते. यावेळी भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी व श्रीफळ वाढविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सोमवारी रात्री ९ वाजता शोभेच्या दारुची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्री मुंबईच्या कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांच्या मनोरंजनासाठी शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते. त्यानंतर भरलेल्या यात्रेत भाविक व ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. यात्रोत्सवात परिसरातील अनेक गावांतील भाविक, कावडीधारक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेत मेवा-मिठाई, खेळणीच्या दुकानांतून मोठी आर्थिक उलाढाल होते. मंगळवारी (दि. ११) म्हणजे यात्रेच्या दिवशी कुस्त्यांची दंगल होणार आहे. बारादारी येथे सायंकाळी ५ वाजता राज्यभरातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत. (वार्ताहर)