येवला : दुसऱ्याचे चांगले चिंता, देव तुमची चिंता करेल. खऱ्या मदतीची ज्याला गरज आहे त्यांनाच मदत करा. भागवत कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल होतो, असे ेविचार वृंदावनचे महाराज डॉ. संजय कृष्ण सलीलजी यांनी व्यक्त केले.येवल्यात माउली लॉन्स येथे ९ ते शुक्र वार २५ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ३ वाजता श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. महाराजांचा सत्कार पारख यांनी, तर प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाचा पगडी देऊन डॉ. सलीलजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नारायण सेवा संस्था अपंग, अनाथ बालकांना सांभाळते, त्यांना त्यांच्या पायावर उभे करते. तेच काम पारख करीत आहेत, असेही डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज यांनी सांगितले. आई या शब्दात मोठी ताकद आहे. यावर रामायण कथेतील दृष्टांत देताना महाराज म्हणाले की, जानकीने ज्यावेळी मंदोदरीला आई म्हणून हाक मारली तेव्हा रागाच्या भरात शाप देण्यासाठी आलेल्या मंदोदरीने जानकीला आशीर्वाद दिला, एवढी ताकद आई या एका शब्दात आहे. विचार चागले ठेवा, सर्व चांगले होते. भागवत गोविंदाचे रूप असल्याचे महाराजांनी सांगितले. यावेळी पंकज पारख, अंबादास बनकर, किशोर दराडे, अजय सोनी, सुशीलभाई गुजराथी, रामेश्वर कलंत्री, कालिदास खैरे, हर्षद पारख, प्रतिभा पारख, निवृत्तीतात्या लहरे, देवचंद गायकवाड, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, वसंत पवार, विठ्ठलराव शेलार आदिंसह परिसरातील भाविक उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त स्व. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था व नारायण सेवा संस्था उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू आहे. (वार्ताहर)
भागवत कथा श्रवणाने आचरणात होतो बदल
By admin | Updated: September 21, 2015 23:34 IST