शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकाली पोलिसांकडून नगरसेवक शेलारांच्या चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:22 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़९) सुमारे पन्नास पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुयोग्य पद्धतीने केला़

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत डीजे वाजवून पोलीस आयुक्तांना आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा फार्स भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि़९) सुमारे पन्नास पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुयोग्य पद्धतीने केला़ शेलार यांच्या पुतण्याला अटक करण्याची तत्परता दाखविणाºया भद्रकाली पोलिसांना नामको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गाजविणाºया गजानन शेलारांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक व सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नगरसेवक शेलार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला़ शेलार यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून, त्यावर सोमवारी (दि़११) निर्णय होणार असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडे न्यायालयातील अर्जाची मागणी करण्यात आली़ मात्र, त्यांच्याकडे ती नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ या ठिकाणी त्यांच्या वकिलांनी कॉपी आणून दिल्यानंतर सुमारे अडीच तासांनी त्यांची सुटका करण्यात आली़ गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी (दि़५) डीजे लावून ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्या प्रकरणी काजीपुरा चौकातील दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक गजानन शेलार, मंडळाचे पदाधिकारी राहुल उर्फ बबलू शांताराम शेलार (रा. बागवानपुरा), खजिनदार योगेश जवाहरलाल मदरेले (रा. चौक मंडई), उपखजिनदार अक्षद अनिल कमोद (रा. कमोद गल्ली) आणि डीजेचालक गणेश हिरामण तोरे (रा. वैद्यनगर) यांच्यावर भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ यापैकी नगरसेवक शेलार वगळता उर्वरित चौघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती़ न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात या चौघांना अटक केली होती़ दरम्यान, शेलार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायालय काय निर्णय देत याकडे नागरिक व पोलिसांचे लक्ष लागले आहे़