शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

भाभा यांनी रचला अणुऊर्जेचा पाया

By admin | Updated: October 9, 2016 00:58 IST

शंकरराव गोवारीकर : मविप्र व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : डॉ. होमी भाभा यांनी भारतात अणुविज्ञानाचा पाया रोवला. भाभा यांनी दिलेल्या योगदानामुळे आपला देश अणुऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व सामर्थ्यशाली होऊ शकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले. निलवसंत फाउंडेशनच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र व्याख्यानमालेत गोवारीकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. व्यासपीठावर डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डी. डी. काजळे , प्रा. रामनाथ चौधरी, एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, अपूर्वा जाखडी, लिना जाखडी उपस्थित होते.गोवारीकर यांनी ‘डॉ. होमी भाभा यांचे भारताच्या अणुविज्ञान क्षेत्रात योगदान, भारताच्या क ामगिरीचा प्रवास’ या विषयावर बोलताना गोवारीकर म्हणाले, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये भाभा यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना भारतात करण्यात आली. भाभा यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे भारतात अणु ऊर्जा केंद्र अस्तित्वात आले. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा, असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. भाभा यांच्या विधायक कार्याच्या बळावर भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला. भाभा यांनी अणुचा संहारक उपयोग होता कामा नये, या उद्देशाने जगातील शास्त्रज्ञांना एकत्र आणून त्यासाठी विशेष प्रयत्न केले, असेही गोवारीकर यावेळी म्हणाले.